शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
5
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
6
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
7
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
8
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
9
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
10
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
11
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
12
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
13
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
14
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
15
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
16
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
17
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
18
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
19
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
20
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्रेत्यांकडून महिलांना मारहाण

By admin | Updated: May 21, 2016 00:55 IST

कोंडखल येथे महिलांना मारहाण करण्याचे प्रकरण एक राजकिय षडयंत्र आहे. विवाह सोहळ्यातील पाईपलाईन बाबत ....

ठाणेदाराने केली दिशाभूल : पोलीस म्हणतात, वाद दारू विक्रीतून नव्हे तर पाईपलाईनच्या मुद्यावरून गेवरा : कोंडखल येथे महिलांना मारहाण करण्याचे प्रकरण एक राजकिय षडयंत्र आहे. विवाह सोहळ्यातील पाईपलाईन बाबत हा वाद असून यात दारूविक्रीचा कुठलाही मुद्दा नाही. याला अकारण अवैध दारू विक्रीचा रंग दिला जात आहे. यातील एकाही आरोपीवर अवैध दारूविक्रीचा गुन्हा नाही, अशी चुकीची माहिती देऊन सावली येथील ठाणेदार विलास निकम यांनी प्रकरणाला वेगळे वळण देऊन शासनाची दिशाभूल केली, असा आरोप कोंडेखल येथील दारूबंदी महिला मंडळाने पत्रकार परिषदेत केला. महिलांना मारहाण केल्याप्रकरणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायतीसमोर दारूबंदी महिला मंडळातील शेकडोच्या वर महिला तसेच गावातील प्रमुख लोक उपस्थितीत होते. ११ मे रोजी दारूबंदी महिलांनी घोडेवाही कोंडेखल हद्दीतील दीड किमी अंतरावर जाऊन किसाननगर येथील दीपक मुठाई यांची मोहफुलाची दारू पकडली. त्यानंतर १५ मे रोजी सायंकाळी अवैध दारू विक्रेत्याकडून महिलांना पोलीस पाटलासमोर मारहाण करण्यात आली. याचा अर्थ गावात सर्रासपणे दारूविक्रीला उधाण आले असुन अवैध दारूविक्रीवर दारूबंदी महिला मंडळांकडून केल्या जात असलेल्या कारवाईबाबत पोलीस आणि दारूविक्रेत्यांमध्ये आकस निर्माण झाला आहे. कोंडेखल येथील तीन अवैध दारू विक्रेत्यांची जामिनावर सुटका करण्यात आली असुन कालिदास नारायण घोडे हा अवैध दारू विक्रेता असुनही पोलिसांच्या हाती अद्याप लागला नसून तो फरार आहे. जामिनीवर सुटून आलेल्या अवैध दारूविक्रेत्यांकडून दारूबंदी करणाऱ्या महिलांना वारंवार जिवे मारण्याची धमक्यासुद्धा देण्यात येत असल्याचे माहिलांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्ह्यात दारूबंदी होण्यापूर्वी कोंडेखल येथे तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून गावात संपुर्ण दारूबंदी होती. त्यामुळे गावाला पुरस्कार मिळाला. गावाचे नावलौकिक झाले. परंतु गावातील काही जबाबदार लोकांकडून कोंडेखल गावात दारूचा महापूर असून विद्यमान पोलीस पाटील योगराज डोनुजी घोडे मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे पोलीस पाटलाला पदावरून काढून टाकण्यात यावे तसेच अवैध दारू विकणाऱ्या फरार कालिदास नारायण घोडे यांना त्वरीत अटक करण्यात यावी, सात दिवसांपर्यंत त्यांना अटक करण्यात आली नाही तर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही दारूबंदी महिला मंडळाने पत्रकार परिषदेत केला. अवैध दारू विक्रेत्यांविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेलेल्या महिलांना दारूबंदी करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या नवऱ्यांना सांभाळा, आम्हाला सतराशे साठ कामे आहेत. ५२ गावांचे तंटे आम्हाला सोडवावे लागतात, असे पोलिसांकडून बजावण्यात येते. दारू विक्रेत्याच्या घरी येऊन पार्ट्या खाणाऱ्या पोलीस विभागातील लोकांवर आता विश्वास राहीला नाही. पोलीस प्रशासन अवैध दारूविक्रेत्यांना मदत करून स्वत: मालामाल होत असल्याने अवैध दारूविक्रीचा महापूर आला आहे. गावातील दारूबंदी समितीतील महिला आपला जीव धोक्यात टाकुन दारू पकडून देत असताना पोलीस विभागाचे सहकार्य मिळत नाही, अशी खंतही दारूबंदी महिलांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.अवैध दारूविक्रेत्यांकडून महिलांना मारहाण करण्यात आल्याच्या घटनेनंतर श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी कोंडेखल येथे जाऊन दारूबंदी महिलांची भेट घेतली. ज्या महिलांना मारहाण करण्यात आली, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी दिले. (वार्ताहर)