शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या साऊंड बाक्समधून दारूची वाहतूक

By admin | Updated: July 10, 2016 00:39 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून अवैध दारूचा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पुरवठा करण्यात येत आहे.

टाटासुमोसह दारू जप्त : सव्वाचार लाखांचा ऐवज जप्तचिमूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून अवैध दारूचा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी अवैध दारू विक्रेते वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत आहेत. टाटा सुमोच्या साऊंड बॉक्समध्ये ९६ निपा विदेशी दारूची वाहतूक करीत असताना चिमूर पोलिसांनी दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली.जिल्ह्यात दारूबंदीनंतर चिमूर शहरात अवैध दारू विक्रेत्यांनी चिमूर पोलिसापुढे मोठे आव्हान उभे केले होते. मात्र नव्यानेच रूजू झालेले ठाणेदार दिनेश लबडे यांनी शहरातील होणाऱ्या अवैध दारू पुरवठ्यावर लगाम लावला आहे. रूजू झाल्यापासून ठाणेदारांनी अवघ्या काही दिवसातच अवैध दारु पुरवठ्याच्या पाच मोठ्या कारवाया केल्या आहेत. त्यामुळे अवैध दारू पुरवठादारात धास्ती निर्माण झाली. तरी अवैध दारू पुरवठादार वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत दारू आणत आहेतच.शुक्रवारचा आठवडी बाजार असल्याने पेट्रोलिंग करीत असताना टाटा सुमो क्रमांक एमएच ३२ सी ३५१९ या गाडीतून अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सदर वाहनाला टिळक वार्डात थांबवून तपासणी असता वाहनात काहीच मिळाले नाही. मात्र अत्यंत बारकाईने वाहणाची तपासणी केली असता गाडीच्या साऊंड बाक्समध्ये व गाडीच्या बॉडीच्या आतमध्ये मॅकडॉल नंबर वनच्या २४ निपा, ओसी ब्ल्यूच्या ७२ निपा, एकूण ९६ निपा आढळून आला. याची किंमत २८ हजार ८०० रुपये व टाटा सुमो गाडी किंमत चार लाख रुपये असा एकूण चार लाख २८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी समीर लतीप शेख (३२) व संकेत अरुण हरिदास (२८) रा. चिमूर यांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनात झाली. (प्रतिनिधी)