वलनी येथे बऱ्याच दिवसांपासून बिनबोभाट अवैधरीत्या देशी दारूची विक्री सुरू होती आणि कोरोना महामारीअंतर्गत राज्यात व जिल्हाभरात लॉकडाऊन सुरू असूनसुद्धा त्यांच्या अड्ड्यावर दिवसरात्र वलनी, सावरगाव येथील दारू पिणारे बेवडे गर्दी करीत होते. याबाबतची माहिती तळोधी पोलिसांना मिळताच नाकाबंदी केली असता टाकलेल्या धाडीत एका प्लास्टिक चुंगड्यात देशी दारू आढळून आली. यात एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल रंगेहाथ पकडण्यात आला. आरोपी दीपक भानुदास चंद्रावत व फरार आरोपी अंगूर भानुदास चंद्रावत, रा. वलनी यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर कार्यवाही सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र खैरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाशकुमार साखरे, पोलीस हवालदार सतीश नेवारे, मोरेश्वर शिंदे आदींनी केली.
वलनी येथे तळोधी पोलिसांनी पकडली दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST