शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मद्य शौकिन विनापरवाना भागवतात मद्याची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील बंद करण्यात असलेली दारु विक्री काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आली. शहरात केवळ बार व देशी भट्ट्या  चालू आहेत. बार किंवा परवानाप्राप्त दारु दुकान चालविण्याकरिता अबकारी विभागाने विविध शर्ती, अटी व नियमांचे पालन परवानाधारक विक्रेत्याने करावे, असे बंधन घालून दिले आहे. त्या अटी, शर्तींची पूर्तता विक्रेत्यांवर बंधनकारक आहे. यात पिणाऱ्याकडे दारु पिण्याचा परवाना आहे किंवा नाही, याची विक्रेत्याला खातरजमा करावी लागते.

दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : अठरा वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला मद्य पिण्याकरिता व विकत देताना विक्रेत्याला त्याच्याकडे परवाना आहे किंवा नाही, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. मात्र, येथील कोणत्याही बारमध्ये परवाना बघितला जात नाही.  पिणाऱ्याकडे परवाना नसताना विक्रेत्यांकडून दारुची सरसकट विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार सुरु आहे.जिल्ह्यातील बंद करण्यात असलेली दारु विक्री काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आली. शहरात केवळ बार व देशी भट्ट्या  चालू आहेत. बार किंवा परवानाप्राप्त दारु दुकान चालविण्याकरिता अबकारी विभागाने विविध शर्ती, अटी व नियमांचे पालन परवानाधारक विक्रेत्याने करावे, असे बंधन घालून दिले आहे. त्या अटी, शर्तींची पूर्तता विक्रेत्यांवर बंधनकारक आहे. यात पिणाऱ्याकडे दारु पिण्याचा परवाना आहे किंवा नाही, याची विक्रेत्याला खातरजमा करावी लागते. शिवाय रोज झालेली विक्री किती परवानाधारकांना करण्यात आली, याचा लेखाजोखा ठेवणे आवश्यक आहे. तसा मासिक हिशेब अबकारी विभागाकडे सादर करावा लागतो. असे असतानाही बारमध्ये विनापरवाना मद्य विकण्यात येत आहे. मासिक अहवाल दाखल करताना दैनिक विक्री कोणत्या परवान्यावर दाखविण्यात येते, असा प्रश्न निर्माण होत आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहनेअनेक बार तसेच दुकानांना पार्किंगची व्यवस्था नसल्याने चक्क रस्त्यावर वाहने उभी ठेवण्यात येतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळेस महिलांना घराबाहेर निघणे अशक्य झाले आहे. अनेकदा वाहने काढताना अपघातही झाले आहेत. याबाबत नागरिकांकडून वारंवार ओरड होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते.