शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

साऊंड बॉक्समधून दारु तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:13 IST

दारुबंदी झाल्यानंतर दारुविक्रेत्यांनी विविध मार्गाने दारुची तस्करी सुरु केली. मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने असाच आणखी एक प्रकार उघडकीस आणला आहे. चारचाकी वाहनातील साऊंड बॉक्समध्ये लपवून ठेवलेला दारुसाठा जप्त केला.

ठळक मुद्देतीन लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दारुबंदी झाल्यानंतर दारुविक्रेत्यांनी विविध मार्गाने दारुची तस्करी सुरु केली. मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने असाच आणखी एक प्रकार उघडकीस आणला आहे. चारचाकी वाहनातील साऊंड बॉक्समध्ये लपवून ठेवलेला दारुसाठा जप्त केला. यावेळी वाहनात विविध ठिकाणी दारु वाहतूक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कप्प्यामधून ९५० बॉटल देशी दारुच्या बॉटल जप्त केल्या. ही कारवाई स्थानिक काळामंदिर परिसरात करण्यात आली असून गाडीमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका चारचाकी वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी सापळा रचून विशेष पथक तयार केले. त्यानंतर स्थानिक समाधी वॉर्ड काळाराम मंदिर येथे नाकाबंदी केली. यावेळी वाहनाची तपासणी सुरु केली. दरम्यान एम एच ३४ के ३६९८ या क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली. दरम्यान गाडीमध्ये साऊंड बॉक्स आढळून आला. यावेळी पोलिसांनी साऊंड बॉक्स उघडून बघितला असता. त्यामध्ये देशी दारु आढळून आली. दरम्यान पोलिसांनी गाडीची कसून तपासणी केली असता, गाडीमध्ये विशेष कप्पे तयार केल्याचे आढळून आले. दरम्यान पोलिसांनी त्या कप्प्याची पाहणी करुन दारुसाठा जप्त केला. यावेळी गाडीमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे, पोलीस उपनिरिक्षक बोरकुटे, दौलत चालखुरे पद्माकर कांबळे, जुमानाके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केली.