शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

चंद्रपूरची ऐश्वर्या सोनकुसरे जिल्ह्यात पहिली

By admin | Updated: June 9, 2015 01:28 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी

चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८४.७४ टक्के लागला. चंद्रपूर येथील लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाची ऐश्वर्या गुरुदास सोनकुसरे ही ९८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात पहिली आली आहे. तिच्या पाठोपाठ सेंट अ‍ॅनस हायस्कूल सुमठाणा येथील श्वेता प्रकाश पोटे ही ९६.८० टक्के गुण घेऊन दुसरी तर ख्रिस्तानंद हायस्कूल ब्रह्मपुरी येथील स्नेहल सुधाकर लोहरकर ही ९६.६० टक्के गुण घेऊन तिसरी आली आहे. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. मागील तीन वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत अव्वल राहिल्या. चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४५२ शाळांमधून ३२ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील ३२ हजार ६९६ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. र्पैकी एकूण २७ हजार ७०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल तीन हजार ४९८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. ९ हजार २५७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ११ हजार ४९७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर चार हजार ९९१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल पाचव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी जिल्हा निकालात तिसऱ्या क्रमांकावर होता. त्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात जिल्ह्याची टक्केवारी चांगलीच घसरली आहे. ँमागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी दहावीच्या परीक्षेत आपल्या हुशारीची चुणूक दाखविली. दहावीच्या परीक्षेत एकूण १६ हजार ७४५ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.यातील १६ हजार ६६२ मुले परीक्षेला बसली. यातील १३ हजार ७७१ मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८२.६५ आहे. यासोबतच एकूण १६ हजार ८६ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १६ हजार ३४ मुलींनी परीक्षा दिली. पैकी १३ हजार ९३६ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८६.९२ आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील मुलींनीही यावेळी चांगला निकाल दिला आहे. (शहर प्रतिनिधी)१०० टक्के निकाल देणाऱ्या शाळा४सेंट मायकल स्कूल, चंद्रपूर, कीर्ती कान्व्हेंट घुग्घुस, नगरपरिषद रय्यतवारी तेलगू शाळा, चंद्रपूर, विद्याविहार कान्व्हेंट इंग्लिश मिडीयम स्कूल, चंद्रपूर, विद्यानिकेतन हायस्कूल, उर्जानगर, चंद्रपूर, सेंट मॅरीस कान्व्हेंट स्कूल, दुर्गापूर, तुकडोजी ग्रामीण विद्यालय, चिंचाळा, सन्मित्र सैनिकी विद्यालय, चंद्रपूर, सरस्वती विद्यामंदिर, म्हातारदेवी, घुग्घुस, चंद्रपूर पब्लिक स्कूल, चंद्रपूर, पॅरामाऊंट कान्व्हेंट हायस्कूल, बाबुपेठ, चंद्रपूर, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय, वेंढली, खालसा कान्व्हेंट महाकाली वॉर्ड, चंद्रपूर, न्यू डॉन पब्लिक स्कूल, तुकूम चंद्रपूर, इनरिच इंग्लिश मिडीयम स्कूल, बाबुपेठ, चंद्रपूर, एम.एब. माडेल हायस्कूल, चंद्रपूर, दिलासा ग्राम कान्व्हेंट स्कूल, बल्लारपूर, भालेराव पब्लिक स्कूल, बल्लारपूर, साईबाबा ज्ञानपीठ कान्व्हेंट, बल्लारपूर, गुरुनानक पब्लिक स्कूल, बल्लारपूर, कर्मवीर विद्यालय, जेना, भद्रावती, डॉ. आंबेडकर मेमोरियल हायस्कूल भद्रावती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, मुर्सा, साखरवाही, श्रीमती डब्ल्यू. पोटदुखे तेलगू विद्यालय, माजरी, सेंट अ‍ॅनेज हायस्कूल, सुमठाणा, भारतीय ग्रामीण विद्यालय, कुचना, ख्रिस्तानंद स्कूल, ब्रह्मपुरी, प्रियदर्शिनी विद्यालय, नांदाफाटा, कोरपना, सेंट अ‍ॅनस हायस्कूल, मूल, माऊंट हायस्कूल, मूल, इन्फंट जेसस इंग्लिश हायस्कूल, राजुरा, स्टिल मॉरीस कान्व्हेंट स्कूल, बागसनवाडा, राजुरा, जिल्हा परिषद हायस्कूल, निमगाव, प्रविणभाऊ अडेपवार हायस्कूल, निफंद्रा, कल्पतरू इंग्लिश मिडीयम स्कूल, सिंदेवाही, नगरपरिषद नेहरू उर्दू हायस्कूल, वरोरा, पोस्ट बेसीक आश्रमशाळा, पिट्टीगुडा, जिवती.शहरी विद्यार्थ्यांची ग्रामीणवर मातपोंभूर्णा हा ग्रामीण तालुका निकालात जिल्ह्यात अव्वल राहिला असला तरी उर्वरित सर्व तालुक्याचा निकाल बघता शहरी विद्यार्थ्यांनी निकालात ग्रामीण विद्यार्थ्यांवर मात केल्याचे दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यातून पोंभूर्णा तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे, ९०.५६ टक्के लागला आहे. मात्र या तालुक्यात शाळांची संख्या अतिशय कमी म्हणजे ९ आहे. तर जिवती तालुका ७५.६७ टक्के घेत पंधराव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. वरोरा, ब्रह्मपुरी, भद्रावती, राजुरा, नागभीड व चंद्रपूर या तालुक्यांनी चांगला निकाल दिला आहे.पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ५४.०५ टक्केदहावीच्या परीक्षेत पुनर्परीक्षार्थ्यांचा (रिपीटर) निकाल ५४.०५ टक्के लागला आहे. एकूण दोन हजार ९६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता नोंदणी केली. यातील दोन हजार ९५३ विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी एक हजार५९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ५४.०५ आहे. पुरर्परीक्षार्थ्यांमध्ये दोन विद्यार्थ्यांनी प्राविण्यप्राप्त केले आहे. ४१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे तर ६५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.कॉपीमुक्त अभियानाचा जिवतीला फटकामागील वर्षी जिवती तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक लागला होता. जिवती तालुका ९७.२७ टक्के निकाल देत जिल्ह्यात अव्वल राहिला होता. यावर्षी शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियान राबविले. जिवती, कोरपना तालुक्यात या अभियानाची कडक अंबलबजावणी झाली होती. या अभियानानंतर यावर्षी जिवती तालुक्याचा निकाल इतर सर्व तालुक्याच्या तुलनेत पिछाडीवर राहिला. कॉपीमुक्त अभियान व भरारी पथकाने केलेल्या कारवाईमुळे जिवतीचा निकाल कमी लागल्याचे बोलले जात आहे.शून्य टक्के निकाल देणाऱ्या शाळाया वर्षी दहावीच्या निकालात शून्य ते ४० टक्केदरम्यान निकाल देणाऱ्या केवळ दोनच शाळा आहेत. ज्या दोन शाळा आहेत, त्यांचा निकाल शून्य टक्के आहे. यात सेंट जोसेफ कृती विकास विद्यालय, बाबुपेठ चंद्रपूर व स्वामी नरेंद्रनाथ विद्यालय, पाटण (चिखली), जिवती या शाळांचा समावेश आहे. या दोन शाळांचा अपवाद सोडला तर जिल्ह्यातील इतर सर्व शाळांचा निकाल यंदा चांगला लागला आहे.