शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सीएमआरच्या माध्यमातून एड्स जनजागृती कार्यक्रम

By admin | Updated: August 14, 2015 01:25 IST

अंबुजा सिमेंट कंपनी, उपरवाही ता. कोरपना, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय व नोबल शिक्षण संस्था, आश्रय ट्रकर्स प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने अंबुजा कंपनी

चंद्रपूर : अंबुजा सिमेंट कंपनी, उपरवाही ता. कोरपना, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय व नोबल शिक्षण संस्था, आश्रय ट्रकर्स प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने अंबुजा कंपनी येथील ट्रान्सपोर्टनगर येथे कंपनीतील ट्रक ड्रायव्हर जनजागृती संदर्भात एम्प्लॉयर लिड मॉडल या नवीन कार्यक्रमाचे उद्घाटन करुन कार्यक्रमाला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांनी कंपनीतील मायग्रंन्ट व ट्रकर्स कामगारांसाठी कंपनीच्या सीएसआर निधीतून काही खर्च हा एचआयव्ही एड्स जनजागृती व आरोग्य तपासणीकरिता वापरुन नियमित कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला.त्याअनुषंगाने अंबुजा सिमेंट कंपनी येथील ट्रान्सपोर्टनगर येथे सकाळी एचआयव्ही, एआयडीएस जनजागृती, माहिती पत्रक वाटप, पोस्टर प्रदर्शन, कन्डोम वापराविषयी जनजागृती तसेच ट्रक ड्रायव्हर व हेल्पर यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये नेत्र तपासणी, शुगर, ब्लड प्रेशर व गुप्तरोग तपासणी करण्यात आली. या शिबिराचा एकूण ४५ ट्रक ड्रायव्हर व हेल्पर यांनी लाभ घेतला. याप्रसंगी अंबुजा सिमेंट हॉस्पिटल उपरवाहीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पोखरना, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरुळकर, नेत्रतज्ज्ञ डॉ. अलोक दोषी, डॉ. पंकज येरणे ट्रकर्स प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक रोशन आकुलवार, प्रकल्प व्यवस्थापक राकेश पालीवार, अंबुजा सिमेंट हॉस्पिटलचे दिनेश उपाध्याय, आयरिस पोतरला, प्रमोद मोहुर्ले, किशोर चौधरी, अंजूला रॉय व शिल्पा साळवे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अनिल उईके, अविनाश सोमनाथे, सनी वरखडे, सुनिल खांडरे, पवन कांत, संजय दुर्गे यांनी परिश्रम घेतले. यावेळी ट्रकचालकांना मार्गदर्शनही करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)