शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला दहा हजारामध्येच करावा लागणार कृषी दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 14:44 IST

राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेला १० हजार तर पंचायत समितीला केवळ ५ हजारात हा कार्यक्रम साजरा करावा लागणार आहे.

ठळक मुद्देपंचायत समितीला पाच हजार खर्च करण्याची मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली कामगिरी लक्षात घेऊन १ जुलै रोजी राज्यात कृषी दिन साजरा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दिन साजरा करण्याची शासनाने परवानगी दिली असून खर्चाची मर्यादाही आखून दिली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेला १० हजार तर पंचायत समितीला केवळ ५ हजारात हा कार्यक्रम साजरा करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातील उपलब्ध अनुदानातच हा खर्च भागवावा लागणार आहे.कृषी दिन साजरा साजरा करण्याबाबत राज्य शासनाने काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. यामध्ये खरीप हंगाम सुरु असल्यामुळे राज्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन, बांधावर जावून पीक निरीक्षक, गावागावांत शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती द्यावी लागणार आहे. कृषी विभागाला यासंदर्भात आराखडा तयार करावा लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून सदर कार्यक्रम साजरा करावा लागणार आहे.कृषी दिन साजरा करण्यासाठी राज्यातील ३५५ पंचायत समितींकरिता १७ लाख ७५ हजार रुपये तसेच ३४ जिल्हा परिषदेला ३ लाख ४० हजार रुपये अशा एकूण २१ लाख १५ हजार रुपयांच्या खर्चाला शासनाने मान्यता दिली आहे.अधिकारी, पदाधिकाऱ्यांची कसरतकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कार्यक्रम करण्यास तसेच खर्चाची मर्यादा ठरवून दिली आहे. मात्र पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांना या अल्प खर्चात कार्यक्रम करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार