शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतीची केली बोगस फेरफार

By admin | Updated: August 30, 2015 00:44 IST

जिवती तालुक्यातील मौजा मरकलमेंढा येथे शेख फकीर अहमद अब्दुल रज्जाक यांची भू.क्र. ७० आराजी २.०० हे आर शेती आहे.

पाटण : जिवती तालुक्यातील मौजा मरकलमेंढा येथे शेख फकीर अहमद अब्दुल रज्जाक यांची भू.क्र. ७० आराजी २.०० हे आर शेती आहे. त्यांचा ९ मार्च १९८९ ला मृत्यू झाल्याने वारसान नोंद २६ जून १९९१ ला करण्यात आली. वारसान नोंद करताना मृत्यू दाखला, वारसान दाखला, पोलीस पाटलाचा दाखला, ग्रामसेवकाचा दाखल घेणे बंधनकारक आहे. मात्र या नियमांना डावलून फेरफार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.फेरफारसंबंधीचे पूर्ण दस्ताऐवज तहसीलदार यांच्याकडे जाऊन पंधरा दिवस ते प्रसिद्ध करुन कोणाची तक्रार आहे का, असे प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. कुणाची तक्रार आली नाही तर ते फेरफार करण्यात येते. परंतु या फेरफारात कोणतेही पुरावे न देता वारसानला सोडून दुसऱ्यांनाच वारसान म्हणून घेण्यात आले. यात फरीद अहमद शेख इब्राहिम, फातिमा बी मिनू खान हे वारसान नसताना वारसान म्हणून कोणतेही पुरावे न घेता वारसान म्हणून नोंद करण्यात आले. फकीर अहमद यांचे वारसान तीन मुली आहेत. इनायत शाहुला शेख, मोहबतनी महबुब शेख, खुशालबी बशीर शेख हे असून यांनी फेरफारसाठी अर्ज केला असता यांना धक्काच बसला. २६ जून १९९१ ला जेव्हा फेरफार करण्यात आले तेव्हा राजुरा तहसील कार्यालय होते. प्रस्तुत प्रतिनिधीने माहिती अधिकारा अंतर्गत अर्ज करुन या प्रकरणाबाबत माहिती मागितली असता जिवती तहसील कार्यालयातून त्यांना माहिती देण्यात आली. त्यात तलाठी रेकॉर्डमध्ये उपरोक्त फेरफारच्या कागदपत्रांची पाहणी केली असता ते आढळले नाही, असे लिखित देण्यात आले. त्यातही शेख फकीर अहेमद अब्दुल रजाक यांचा मृत्यू दाखला ३१ मार्च २०१५ ला काढण्यात आला आहे तर १९९१ ला फेरफार झाले तरी कसे, असा प्रश्न पडला आहे. याबाबत शेख यांनी पोलिसात तक्रार करून तहसीलदार, पटवारी व खोटे वारसान यांच्यावर रितसर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)