शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीसाठी गायत्री परिवारासोबत करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:29 IST

गायत्री परिवाराने महाराष्ट्रामध्ये वृक्ष लागवड मोहिमेत यापूर्वीही मोठे योगदान दिले आहे. यापुढेही गायत्री परिवाराचे वृक्ष लागवडीच्या कामांमध्ये वनविभागामार्फत सहकार्य घेतले जाईल. त्यासाठी लवकरच परस्पर सामंजस्य करार करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्ह्यातील पंच-सरपंच मेळाव्याला मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गायत्री परिवाराने महाराष्ट्रामध्ये वृक्ष लागवड मोहिमेत यापूर्वीही मोठे योगदान दिले आहे. यापुढेही गायत्री परिवाराचे वृक्ष लागवडीच्या कामांमध्ये वनविभागामार्फत सहकार्य घेतले जाईल. त्यासाठी लवकरच परस्पर सामंजस्य करार करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे केले.चंद्रपूर जिल्ह्यातील पंच-सरपंच मेळाव्याचे गायत्री परिवाराने आयोजन केले होते. या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. हरिद्वार येथील शांती कुंज गायत्री परिवारमार्फत चंद्रपूरमध्ये दाताळा रोड येथे जिल्ह्यातील पंच- सरपंच व युवा संगोष्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, गायत्री परिवाराचे हरिद्वार येथील योगेंद्र गिरी, नागपूर छत्रपती योगीराज बल्की, सुनील शर्मा, भास्कर पेरे पाटील, पर्यावरण तज्ज्ञ सुरेश राठी, मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, नामदेव डाहुले आदी उपस्थित होते.ना. मुनगंटीवार म्हणाले, देशाला बळकट करण्यासाठी प्रत्येक गावाचे दायित्व असले पाहिजे. प्रत्येकाला आपल्या देशात रामराज्य आले पाहिजे, असे वाटते. मात्र यासाठी प्रत्येक गावाने नव्हे, तर प्रत्येक गावातील, प्रत्येक व्यक्तीने आपले दायित्व देणे महत्त्वाचे आहे. मानवाच्या जन्मात आल्यानंतर त्याचे जगणे त्यागी असले पाहिजे. हा देश त्यागाची भूमी म्हणून ओळखला जातो. स्वत:साठी न जगता इतरांसाठी जगण्याची जी संकल्पना गायत्री परिवाराने समाजात रुजविली आहे, त्या संकल्पनेचा त्यांनी यावेळी गौरव केला. राज्य शासनाने यापूर्वी राबविलेल्या वृक्ष लागवडीमध्ये गायत्री परिवाराने मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी गायत्री परिवाराचे सदस्य आहे. त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या आगामी ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये गायत्री परिवारासोबत वनविभाग राज्यस्तरीय सामंजस्य करार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सूतोवाच केले. वृक्ष लागवडीमध्ये गायत्री परिवारांनी आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.