शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनकर्त्या दीडशे कामगारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:54 IST

मोहबाळा गावालगत असणाºया एमआयडीसीमधील साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनीतील इन्कॉटेक कंपनीने कोणतेही कारण नसताना दीडशे कामगारांना कामावरून कमी केले.

ठळक मुद्देसाई वर्धा वीजनिर्मिती प्रकल्प : कामगारांचे बेमुदत ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मोहबाळा गावालगत असणाºया एमआयडीसीमधील साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनीतील इन्कॉटेक कंपनीने कोणतेही कारण नसताना दीडशे कामगारांना कामावरून कमी केले. त्यामुळे उपासमारीचे जीवन जगत असलेल्या कामगारांनी बुधवारी प्रहार विद्युत कामगार संघटनेचे महासचिव बाळकृष्ण जुवार व प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष अमोल डुकरे यांच्या नेतृत्वात बुधवारला बेमुदत ठिय्या आंदोलन केले. यावेळी शेकडो आंदोलकांची अटक व सुटका करण्यात आली.साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनी गेल्या आठ वर्षांपासून कोळशापासून वीज निर्मितीचे काम करीत आहे. या कंपनीत निरनिराळ्या तांत्रिक पदावर कामगार कार्यरत असून कंपनीत अनेक सह कंपन्या कार्यरत आहेत. यातील चेन्नई राधा या कंपनीचा कंत्राट संपुष्टात आल्यामुळे ३० जून २०१७ पासून इन्कॉटेक कंपनी काम करीत आहे. इन्कॉटेक कंपनीने सर्वच कंत्राटी कामगारांच्या मुलाखती घेऊन कामगारांना कामावर घेण्यात येईल, असा नोटीस कंपनीच्या नोटीस बोर्डवर लावला होता. कामगारांच्या हुद्दा प्रमाणे १५ व १६ जुलैला मुलाखती ठेवल्या. पण कुठलीही मुलाखत न घेता २१ जुलैपासून १५० स्थानिक कामगारांना कंपनीने प्रवेश बंद केला होता. आतापर्यंत अनेक निवेदने देऊनही कंपनी प्रशासन कामगारांना घेण्यास तयार नसल्याने ३ महिन्यांपासून कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे.प्रशासनाकडे दाद मागून कुठलाही तोडगा न निघाल्याने बुधवारला कामगारांनी बेमुदत आंदोलन पुकारले. सकाळी ८ वाजता सुरु झालेल्या या आंदोलनात १५० कामगार सहभागी झाले होते. कामगारांनी मुख्य प्रवेश द्वारावरच ठिय्या आंदोलन सुरु केल्याने सकाळ पाळीतील कामगार कंपनीत प्रवेश करू शकले नाही. जो पर्यंत सर्व कामगारांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा, निर्णय आंदोलकांनी घेतला. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. यावेळी अमोल डुकरे, बाळकृष्ण जुवार, अमित निब्रड, सुरज घुमे, नितीन नागरकर, समीर पाटील, राम घोगरे, किरण जोगी, प्रशांत भोयर, अशोक चिकटे, संतोष बुटले, विवेक लभाने, सुशील पिंपळकर, अशोक चिकटे व इतर कामगार व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.