शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 00:35 IST

शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर विकास कामासाठी पैसेच राहणार नाही,

विजय वडेट्टीवार : ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळावाचंद्रपूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर विकास कामासाठी पैसेच राहणार नाही, असे म्हणणाऱ्या भाजपा सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करणार, असे म्हणून शेतकऱ्यांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मात्र काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कर्जमाफी मिळेपर्यंत पक्षाचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष तथा विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे उपगट नेता आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ब्रह्मपुरी येथे शनिवारी तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभ पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष खेमराज तिडके, जिल्हा परिषद सदस्य राजेश कांबळे, स्मिता पारधी, प्रमोद चिमूरकर, सतीश वारजूरकर, गजानन बुटके, पं. स. सदस्य थानेश्वर कायरकर, नगर परिषद उपाध्यक्ष रश्मी खानोरकर, नगरसेविका फुलझले, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष मंगला लोनबले, माजी नगरसेवक विलास विखार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन उराडे यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.आ. वडेट्टीवार म्हणाले, निसर्गाची अवकृपा, शेतमालाला भाव नाही अशा अस्मानी संकटाच्या कचाट्यात अडकून शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. गेल्या अडीच वर्षात आठ हजार पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेली आहे. दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरी सुद्धा भाजप सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, असे ते म्हणाले. या मेळाव्यात नवनिर्वाचित जि. प. सदस्य राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, प. स. सदस्य थानेश्वर कायरकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, महिला तालुका काँग्रेस अध्यक्षा मंगला लोनबले, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष व सर्व काँग्रेसचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)