शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

आंदोलन चिघळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:27 IST

चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता काँग्रेसच्या नेतृत्वात भिसी येथे बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देकाही काळ तणाव : शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा व रास्तारोको

आॅनलाईन लोकमतभिसी : चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता काँग्रेसच्या नेतृत्वात भिसी येथे बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर भिसी बायपासवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. निवेदन स्वीकारण्यासाठी एकही वरिष्ठ अधिकारी न आल्याने आंदोलनकर्त्यांनी निवेदन देण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.भिसी, वाढोणा येथे वनविभागाने मंजूर केलेल्या जाळीच्या कुंपनाच्या निविदा पुनश्च काढण्यात याव्या, जंगली जनावरांपासून होणारी शेतीची नुकसान भरपाई नुकसानीच्या तुलनेत देण्यात यावी, स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव व अधिकचा ५० टक्के नफा देण्यात यावा, शेतकऱ्यांसाठी २४ तास थ्री फेज विद्युत पुरवठा देण्यात यावा, कृषिपंपाची डिमांड भरताच एक महिन्याच्या आत वीज जोडणी झालीच पाहिजे, गोसेखुर्द प्रकल्पाच्या मोखाबर्डी उपसा जलसिंचन कालव्याच्या दुरूस्तीसह बांधकाम पूर्ण करावे, शेतमजुरांना शेतीसाठी शासकीय जमिनीचे पट्टे वाटप करण्यात यावे, वनडेपोत बांबु व लाकडांचा पुरवठा नियमित उपलब्ध करून देण्यात यावा, भिसी परिसरातील चिंचोली सावर्ला, डोंगर्ला, जांभूळहिरा, नवेगाव, पुयारदंड, गडपिपरी, सिरसपूर, शिवरा, लावारी इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या शेती जंगलालगत असल्यामुळे त्यांच्या शेतातील पिकांची जंगली जनावरे नासधूस करीत असतात. त्यामुळे सदर गावांच्या सभोवताल काटेरी कुंपन करण्यात यावे, आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. सदर आंदोलनात जि.प.चे काँग्रेसचे गटनेता डॉ. सतीश वारजुकरांसह शेतकरी शंभरावर बैलबंडी घेऊन सहभागी झाले होते.आंदोलनकर्त्यांना अटक व सुटकाआंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यां डॉ. सतीश वारजूकर यांच्यासह इतर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे आंदोलनकर्ते संतापले. त्यांनी पोलिसांच्या वाहनासमोर उभे राहून वाहन अडवून धरले. अखेर पोलिसांना हतबल होऊन अटक केलेल्या डॉ.वारजूकर यांच्यासह इतरांना सोडून द्यावे लागले.