शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

कामात रमले की वयाचा विसर पडतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:26 AM

मनात उत्साहा असला की वयाला मागे टाकून उर्मीने कामात झोकून देता येते. त्यातून वेळ चांगला जातो आणि आपले हातून काहीतरी चांगले भरीव घडत असल्याचा मनस्वी आनंदही मिळतो.

ठळक मुद्देसंडे अँकर । वृद्धाश्रमातील जेष्ठांचे मत

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : मनात उत्साहा असला की वयाला मागे टाकून उर्मीने कामात झोकून देता येते. त्यातून वेळ चांगला जातो आणि आपले हातून काहीतरी चांगले भरीव घडत असल्याचा मनस्वी आनंदही मिळतो. बल्लारपूर - चंद्रपूर आपल्या हातांनी तयार केलेले आंब्याचे चवदार लोणचे, मसाले नक्षीदारपणे सजविलेले मातीचे दिवे, महिलांच्या आवडत्या श्रृंगाराच्या वस्तू, कागदांची पाकीट हे सारे बघितल्यानंतर वरील विधानाची साक्ष पटते. या साऱ्या वस्तू वृद्ध आनंदाने, उत्साहात एकत्रित बसून बनवितात. वृद्धाश्रमाला भेट देणारे त्या वस्तू विकत घेतातच, बाहेरही या वस्तूंना मागणी आहे.दिवाळीत येथील कलात्मक दिव्यांना मुंबई - पुणे भागातून पसंती मिळाली असून दरवर्षी तेथून त्याकरिता आॅर्डर मिळतात. दरवर्षी सुमारे सव्वा लाख दिवे सजवून विकले जातात. इतर अन्य वस्तूबाबतही जवळपास तेच. या वस्तूंच्या विक्रीतून वृद्धाश्रमाला आर्थिक सहाय्य मिळते. आणि आपण, आपल्या या वृद्धाश्रमाकरिता काही तरी करीत आहोत, याचे समाधान तेथील वृद्धांना मिळते. या उपक्रमाच्या घरगुती उद्योगाच्या प्रेरक या वृद्धाश्रम समितीच्या अध्यक्ष माजी मंत्री शोभाताई फडणवीस या आहेत. ट्रस्टी डॉ. रजनीताई हजारे, व्यवस्थापिका अर्चना लाडसावंगीकर या वृद्धांना प्रेरित करून त्यांना या कामी मदत करीत असतात. या सोबतच तेथील १७ वृद्धांनी देहदानाचा संकल्प केला आहे. त्यातील चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे देहदान चंद्रपूर मेडिकल कॉलेजला करण्यात आले. आत्मबल आणि सामाजिक बांधिलकी जपणाºया या वृद्धाश्रमात सध्या ३२ वृद्ध आहेत. हे वृद्धाश्रम २६ फेब्रुवारी १९९५ ला उघडले. प्रारंभी शासनाकडून अनुदान मिळत असे. काही वर्षांनी अनुदान मिळणे बंद झाले. त्यामुळै आश्रम कसा चालावयाचा, असा प्रश्न उभा झाला. काही दानशूर मदतीला धावून आले. सेवाभावी व सामाजिक संस्थांकडूनही मदत मिळू लागली आणि हे वृद्धाश्रम गेले सुमारे २४ वर्षांपासून वृद्धांंना सर्व सोयी देत, त्यांची देखभाल करीत सुरू आहे. वृद्धांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीतूनही काही हातभर मिळतो आहे. एक एकराची शेती आहे. वृद्ध आवडीने तेथेही रमतात. कामात मदत करतात. आत्मबल असले की सारे साध्य होते. हेच या साºयातून दिसून येते.