शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

शासन निर्णय विरोधात अंगणवाडी सेविकांची धरणे

By admin | Updated: March 25, 2015 01:26 IST

अंगणवाडी महिलांनी दीर्घकाळ लढा देऊन मानधन वाढ मिळवून घेतली व त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१४ पासून करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता.

चंद्रपूर : अंगणवाडी महिलांनी दीर्घकाळ लढा देऊन मानधन वाढ मिळवून घेतली व त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१४ पासून करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. अंमलबजावणी होऊन वाढीव दराने मानधन सुरू झाले. मात्र असे असताना सत्तेत नव्याने आलेल्या भाजप शासनाने तत्कालीन सरकारचा निर्णय बदलवून १ एप्रिल २०१५ पासून मानधन वाढ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे केले. अल्पशा मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचे ११ हजार ४०० रुपये तर मदतनिसांचे सहा हजार रुपये भाजप शासनाने गिळंकृत केले आहे. त्यामुळे अंगणवाडी महिलांत प्रचंड असंतोष निर्माण झाला. या निर्णयाच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा परिषदेसमोर धरणे देण्यात आले. मानधन वाढीचा निर्णय मागे घ्या, तत्कालीन सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी मार्गदर्शन करताना शासनकर्त्यांनी अंगणवाडी महिलांच्या पोटात खंजीर खुपसला असल्याचा आरोप केला. शासनाने हा निर्णय त्वरीत मागे घेऊन अंगणवाडी सेविकांची उपासमार थांबविण्याची मागणी केली. धरणे आंदोलनात शोभा मांडवकर, ज्योती लोडल्लीवार, आशा नाखले, संध्या खनके, रेखा रामटेके, कुंदा वाघमारे, वैशाली बोकारे, कविता बोकारे, शकुंतला शर्मा, सुशीला कर्णेवार आदी अंगणवाडी महिला सहभागी झाल्या होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)