शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या विरोधात शेतकºयांचा मोर्चा धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:28 IST

केंद्र व राज्यात सुरू असलेल्या हुकुमशाही धोरणामुळे संपूर्ण देशातच असंतोषाची लाट पसरली आहे. जगाचा पोशिंदा माणल्या जाणाºया शेतकºयांवर अन्यायकारक धोरण लादून त्यांची गळचेपी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसुभाष धोटे यांचे नेतृत्व : गोंडपिपरी तालुक्यातील शेकडोंचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : केंद्र व राज्यात सुरू असलेल्या हुकुमशाही धोरणामुळे संपूर्ण देशातच असंतोषाची लाट पसरली आहे. जगाचा पोशिंदा माणल्या जाणाºया शेतकºयांवर अन्यायकारक धोरण लादून त्यांची गळचेपी करण्यात येत आहे. अशातच शेतकºयांना प्रथमत:च संपावर जावे लागले. राज्य सरकारने फसवी कर्जमाफीची घोषणा करून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. याविरोधात गोंडपिपरी येथे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ या अभियानातंर्गत शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक गांधी चौक ते तहसील कार्यालय निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व क्षेत्राचे माजी आ. सुभाष धोटे, कृउबा सभापती सुरेश चौधरी, राजीवसिंह चंदेल, कृउबा उपसभापती अशोक रेचनकार, राजुरा तालुकाध्यक्ष दादाजी लांडे, शंकूजी येलेकर, तुकाराम झाडे, माजी उपसरपंच देवेंद्र बट्टे, देविदास सातपुते, हेमंत झाडे, राजु राऊत यांनी केले.मोर्चात सहभागी शेतकºयांनी राज्य शासनाच्या अन्यायकारक धोरणा विरोधात नारेबाजी केली. त्यानंतर तहसील कार्यालय परिसरात सभा झाली. सभेला आमदार सुभाष धोटे यांनी मार्गदर्शन करून राज्य सरकारवर टिका केली. त्यानंतर तहसीलदार किशोर येरणे यांची शिष्टमंडळाने भेट घेवून ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या आशयाचे अडीच हजार अर्ज व प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले.