शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

लेखी आश्वासनानंतर वेकोलि प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे

By admin | Updated: June 18, 2016 00:35 IST

वेकोलिने नोकरीवर सामावून घ्यावे, या मागणीकरिता मागील काही दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू होते.

वरोरा : वेकोलिने नोकरीवर सामावून घ्यावे, या मागणीकरिता मागील काही दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू होते. त्यानंतर गुरूवारी कोळसा खाणीचे काम बंद पाडण्यात आले. अखेरीस वेकोलिने नोकरी देण्याची लेखी हमी दिल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी आंदोलन मागे घेतले.न्यु माजरी टू ओपन कास्ट या खुल्या कोळसा खाणीकरिता जून २०१५ मध्ये पाटाळा, शिवाजी नगर, नागलोन, पळसगाव गावातील जमीन संपादित करुन मोबदला देण्यात आला. त्यानंतर वेकोलिने कोळसा उत्पादन सुरू केले. प्रकल्पग्रस्तांना वेकोलिच्या वतीने ४८ दिवसाचे प्रशिक्षण देऊनही नोकरी देण्यास टाळाटाळ झाली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी ९ जूनपासून साखळी व आमरण उपोषण सुरू केले. याबाबत सीएमडी सोबत चर्चा करण्यात आली. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्याने आमरण उपोषण सुरू ठेवले. त्यातच अचानक न्यु माजरी टू ओपन कास्टचे काम गुरूवारी बंद पाडण्यात आले. कोळसा खाणीचे काम बंद पडताच वेकोलि प्रशासन खळबळून जागे झाले. घटनास्थळावर वेकोलिचे अधिकारी पोहचले. त्यात झालेल्या वाटाघाटीत प्रकल्पग्रस्तांना रोजगारासंबंधी ३० जुलै पर्यंत कार्यवाही पूर्ण केली जाईल, वेकोलि व प्रकल्पग्रस्त एकमेकांना सहकार्य करतील. ज्या प्रकरणात कागदपत्र लागतील ते कागदपत्र प्रकल्पग्रस्त वेकोलिला देतील, वेकोलि बोर्डाच्या अनुमती नंतर दहा दिवसात कार्यवाही करुन १५ आॅगस्टपर्यंत मोबदला, नोकरी देण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)