शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या संघर्षानंतर उद्ध्वस्त कुटुंबे सावरु लागली

By admin | Updated: December 1, 2014 22:51 IST

ज्या गावात ‘देशी नाही असा गाव देशात नाही’ असे म्हटले जात असले तरी मोहाळी हे गाव याला अपवाद आहे. येथील महिलांच्या मोठ्या संघर्षानंतर गावात पूर्णत: दारुबंदी झाली.

मोहाळी (नलेश्वर) : ज्या गावात ‘देशी नाही असा गाव देशात नाही’ असे म्हटले जात असले तरी मोहाळी हे गाव याला अपवाद आहे. येथील महिलांच्या मोठ्या संघर्षानंतर गावात पूर्णत: दारुबंदी झाली. दारुमुळे उद्ध्वस्त झालेली कुटुंबे आता हळूहळू सावरु लागली आहेत. यात महिलांचा संघर्ष त्याला तंटामुक्त गाव समितीचे सहकार्य, यातून हा चमत्कार घडत आहे. मिसरुड न फुटलेल्या तरुणांना दारुचे व्यसन जडल्याने मद्यपींची संख्या वाढली होती. समाजासाठी हे घातक ठरले तरी इतर कुठलीच तमा न बाळगता मद्यपी मदमस्त जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातच आर्थिक चणचण व मानसिक तणावामुळे गावातील शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झालीत. तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने आता ही कुटुंबे सावरु लागली आहेत.मोहाळी येथे मागील दीड वर्षांपूर्वी नव्याने तंटामुक्त गाव समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सामजिक जाणिवेचा कार्यकर्ता तेजराज नन्नावरे याची निवड करण्यात आली. गावातील महिलांनी या तरुणाकडे धाव घेऊन गावात दारुबंदी करण्याची मागणी केली. गावात या विषयावर ग्रामसभा घेण्यात आली. आणि विलक्षण बदल जाणवला. लोकांनी मद्यप्राशन करणे सोडले नसले तरी प्रमाण मात्र फार कमी झाले. दारूच्या अवैध व्यवसायावर लाखो रुपयांची होणारी वार्षिक उलाढाल ठप्प पडली. कुटुंबातील व्यक्ती कामात गुंतली आणि दारूमुळे उद्ध्वस्त कुटुंबही पुन्हा उभे राहू लागले असल्याचे चित्र सिंदेवाही तालुक्यातील तीन हजार लोकसंख्या असलेल्या मोहाळी गावात दिसून येत आहे. मोहाळी या गावात दीड वर्षांपूर्वी येथील अनेक तरुणापासून तर वृद्धापर्यंत सर्वच स्तरातील लोकांची गावातील अवैध दारू व्यावसायिकांकडे रीघ लागायची. आनंदाची वेळ असो वा दु:खाचा प्रसंग, होळी असो वा पोळा दारू पिण्यासाठी त्यांना केवळ निमित्त हवे असायचे. दारूची वाढती मागणी लक्षात घेता दारू व्यवसायात स्पर्धा रंगू लागली. यातून वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल सुरू होती. शासनाच्या निर्देशानुसार गावात दीड वर्षांपूर्वी नव्याने तंटामुक्त गाव समिती गठीत झाली. त्यानंतर गावातील दारुबंदीचा विषय ग्रामसभेत मोठ्या चवीने चर्चील्या गेला. अतीमद्यप्राशनाने प्रकृतीत बिघाड, कुटुंबकलह व आर्थिक चणचण अशा एक ना अनेक समस्या उद्भवत असल्याने यातून भांडणे तंटे निर्माण होत असे. ही बाब सुज्ञ गावकऱ्यांच्या मनाला लागली. सुमारे ५० वर्षांपासून सुरु असलेल्या अवैध दारुचा व्यवसाय बंद करणे येथील तंटामुक्त गाव समितीला सहज व सोपे नव्हते. दरम्यान गावातील एका सशक्त महिला समुहाने मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले.महिलांनी सतत दारूविक्रीच्या विरोधातील व्यापक मोहिम राबविताना त्यांना कुटुंबाची नाराजी ओढावून आर्थिक संकटाचा सामना करीत दररोजच शिव्यांचा मारा सहन करावा लागला.याही परिस्थितीत अवैध दारु विक्रीचा प्रकार सुरूच होता. सायंकाळ होताच व्यसनी लोक दारू विक्रेत्यांकडे धाव घेत असत. ही बाब हेरून तंटामुक्त समितीच्या सदस्य असलेल्या महिला समूहाने धाडसत्र राबविले. दारू प्राशन व विक्री करताना कित्येकांना रंगेहाथ पकडून तंटामुक्त समितीच्या स्वाधीन केले. दरम्यान, महिलांनी रात्रं जागून काढल्या. दारू प्राशनानंतर मुलाच्या बेताल वागण्यामुळे कुटुंबाला अनेकदा प्रचंड त्रास होत होता. भारताचे नवे आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीला दारूसारख्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी समाजातील सर्व घटकातील व्यक्तीकडून प्रबोधन करण्यात आले. आज दीड वर्षांच्या संघर्षानंतर दारूमुळे उद्ध्वस्त झालेली कुटुंबे आता सावरु लागली आहेत. दारूबंदीमुळे गावात शांततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. (वार्ताहर)