शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात शौचालयापाठोपाठ आता घरकुलही झाले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 10:57 IST

शौचालयापाठोपाठ लाभार्थ्यांचे घरकूलही गायब झाले असून बांधकाम न करताच घरकूल बांधल्याची शासन दरबारी नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापूर येथे उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देतेलही गेले, तूपही गेले...

फारुख शेख।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती तालुक्यात काही महिन्यांपुर्वी शौचालय घोटाळा चांगलाच गाजला होता. आता शौचालयापाठोपाठ लाभार्थ्यांचे घरकूलही गायब झाले असून बांधकाम न करताच घरकूल बांधल्याची शासन दरबारी नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापूर येथे उघडकीस आला आहे.जनकापूर येथील गुंडेराव भीमू आत्राम, विठ्ठल लटारी नैताम यांना सन २०१३-१४ मध्ये इंदिरा आवास योजनेंतर्गत एक लाख रुपये अनुदानाचे घरकुल मंजूर झाले. तत्कालीन ग्रामसेवकाने सदर लाभार्थ्यांना घरकूलाचे बांधकाम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार लाभार्थ्यांनी आपले कच्चे घर पाडून घरकूल बांधकामाला सुरुवात केली. अनुदानासाठी बँकेचे खाते उघडले.मात्र एक महिन्यानंतर पहिल्या बिलासाठी लाभार्थी जिवती पंचायत समितीमध्ये गेले असता त्यांना धक्काच बसला. येथे त्यांना आपले घरकूल बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद आढळून आली. त्यामुळे लाभार्थी माघारी परतले.

घरकूल बांधून द्यावेअनेकांनी घरकूल मिळणार म्हणून आपले राहते कच्चे घर पाडून टाकले. मात्र बांधकामाआधीच बांधकाम पूर्ण झाल्याची शासन दरबारी नोंद आहे. परिणामी लाभार्थ्यांना अनुदानासाठी चकरा माराव्या लागत असून कुटुंब उघड्यावर आले आहे. काही दिवसांपुर्वी जिवती तालुक्यातील पाटण व धनकादेवी ग्रामपंचायत अंतर्गत लाभार्थ्यांचे शौचालय चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर तत्कालीन ग्रामसेवक व सरपंचावर गुन्हे दाखल करण्यात आले व लाभार्थ्यांना नव्याने शौचालय बांधून देण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे. आता घरकूल घोटाळा उघडकीस आल्याने प्रशासन संबधितांवर काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.जिवती तालुक्यात घरकुलांची अशी ५६ प्रकरणे असून कार्यालयीन तत्कालीन लिपीकाच्या चुकीमुळे लाभार्थ्यांनी घरकूल न बांधताच बांधल्याचे दर्शवले आहे. या ५६ लाभार्थ्यांची नावे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठविली आहेत.- सुरेश बागडे, संवर्ग विकास अधिकारी, जिवती.

शासकीय कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे आमचे कुटुंब उघड्यावर आले आहेत. घरकुल मिळणार म्हणून कच्चे घर पाडून टाकले. पाळीव बकऱ्या विकून घरकुलासाठी जोत्याचे बांधकाम केले. मात्र आवास योजनेचे अनुदान मिळालेले नाही. अनुदानासाठी पंचायत समितीत वारंवार चकरा मारत आहोत.- विठ्ठल लटारी नैताम, लाभार्थी, जनकापूर.

टॅग्स :Governmentसरकार