शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदारांच्या आदेशानंतरही पोलीस चौकी बंद

By admin | Updated: July 19, 2014 23:50 IST

शांतता तसेच सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील काही भागांमध्ये पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र यातील काही चौकी नेहमी कुलूप बंद रहात असल्याने नागरिकांना मोठा त्रास

चंद्रपूर : शांतता तसेच सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील काही भागांमध्ये पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र यातील काही चौकी नेहमी कुलूप बंद रहात असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पोलीस चौकीच्या परिसरात गुऱ्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरातील पोलीस चौकी पूर्णवेळ सुरु ठेवून येथे पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.येथील बाबूपेठ परिसरातील नागरिकांच्या तक्रारी तसेच गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस चौकी निर्माण करण्यात आली. ही चौकी पूर्वी व्यवस्थित सुरु होती. मात्र मध्यंतरी या चौकीला कुलूप लावण्यात आले. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस चौकी पूर्ववत सुरु झाली. मात्र काही दिवसातच चौकीमध्ये अनियमितपणा आला. महिनाभरात अर्धेअधिक दिवस ही चौकी बंद रहाते. त्यामुळे येथील काही नागरिकांनी ठाणेदाराकडे याबाबत तक्रार दाखल केली. ठाणेदारांनी तत्काळ दखल घेत ही पोलीस चौकी सुरु ठेवण्याचे आदेश दिले. मात्र ठाणेदाराच्या आदेशाली पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखविली आहे. पोलीस चौकी पूर्णवेळ सुरु रहात नाही. त्यामुळे अनेकवेळा तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना पोलिसांची वाट बघत ताटकळत बसावे लागते. चौकी बंद रहात असल्याने अवैध धंदे, छोट्या-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील पोलीस चौकी नियमित सुरु ठेवून नागरिकांना दिल्यासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, १९ जूलै रोजी सकाळी पोलीस कर्मचाऱ्यांनी विविध कामांसाठी सकाळी ११ वाजता बोलाविले. पोलिसांच्या आदेशानुसार नागरिक सकाळी ११ वाजता पोलीस चौकीत पोहोचले. मात्र येथे एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला. ठाणेदारांनी याकडे लक्ष देवून पूर्णवेळ पोलीस चौकी सुरु राहील, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(नगर प्रतिनिधी)