शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदेशानंतरही जि. प. तील २६३ अनुकंपाधारकांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 23:08 IST

जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर संबंधीत कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचा आदेश राज्य शासनाने दिला होता. मात्र, जिल्हा परिषदेतील तब्बल २६३ अनुकंपधारकांची पदे अद्याप भरण्यात आली नाही. त्यामुळे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीविना हाल सुरू आहेत.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा : नोकरीपासून वंचित राहिल्याने कुटुंबीयांचे हाल
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर संबंधीत कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचा आदेश राज्य शासनाने दिला होता. मात्र, जिल्हा परिषदेतील तब्बल २६३ अनुकंपधारकांची पदे अद्याप भरण्यात आली नाही. त्यामुळे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीविना हाल सुरू आहेत.जिल्हा परिषद अंतर्गत मागील १५ वर्षांपासून अनुकंपधारकांचा जागा भरण्यात आल्या नाहीत. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभाग, ग्रामीण विकास, विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अनुकंपधारकांनी वारंवार पाठपुरावा केला होता. दरम्यान नोकरीमध्ये पात्र ठरणाºया अनुकंपधारकांना तातडीने सामावून घेण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केला. परंतु जि. प. ने या आदेशाची अंमलबजावणीच केली नाही. शासनाचे तत्कालीन प्रधानसचिव (सेवा) भगवान सहाय यांनी अनुकंपधारकांचे प्रश्न योग्यरित्या समजून घेतले. त्यानंतर संबंधित अधिकाºयांना पुढील कारवाईचे आदेश दिले होते. हा आदेश जिल्हा परिषदेमध्ये धडकल्यानंतरही कारवाई झाली नाही. २०१५ पासून जि. प. मध्ये केवळ एकाच व्यक्तीची अनुकंप जागेवर नियुक्ती करण्यात आल आहे. त्यातही योग्य श्रेणी देण्यात आली नाही. याचा अनिष्ठ परिणाम अनुकंपधारकांवर झाला आहे. २६८ अनुकंपधारकांच्या जागा रिक्त आहेत. आता ही संख्या ३०० पेक्षाही अधिक झाल्याचेही अन्यायग्रस्तांनी सांगितले.केवळ टोलवाटोलवीची उत्तरेअनुकंपधारकांना जिल्हा परिषदेमध्ये तातडीने रुजू करून घेण्याचे आदेश शासनाने दिले. यानंतर पात्र व्यक्तींनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. राज्य शासनाच्या आदेशाची प्रत दाखविली. तत्कालीन मुख्यमंत्री व संबंधित विभागाच्या राज्यमंत्र्यांचेही पत्राद्वारे लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र टोलवाटोलवीचा हा प्रकार मागील १५ वर्षांपासून सुरूच आहे. परिणामी कुटुंबातील आधार कोसळल्याने आर्थिक व मानसिक त्रासाचा सामना करण्याची वेळ जिल्ह्यातील २६३ अनुकंपधारकांवर आली आहे.