शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आयएसओ नामांकनानंतर घाटकुळ झाले नवा आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:37 IST

मुख्यमंत्र्यांच्या नाविन्यपूर्ण महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट ग्रामपंचायत घाटकुळची विकास कामातून आदर्श गावाकडे वाटचाल होत आहे. नुकतेच शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतीला आयएसओ नामांकन मिळाले आहे. थेट आयएसओ ग्रामपंचायतीचे लोकार्पण करण्यात आलेली घाटकुळ ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.

ठळक मुद्देइतर गावांकडूनही दखल : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे फलित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुख्यमंत्र्यांच्या नाविन्यपूर्ण महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट ग्रामपंचायत घाटकुळची विकास कामातून आदर्श गावाकडे वाटचाल होत आहे. नुकतेच शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतीला आयएसओ नामांकन मिळाले आहे. थेट आयएसओ ग्रामपंचायतीचे लोकार्पण करण्यात आलेली घाटकुळ ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, ग्राम पंचायत घाटकुळ आयोजित नाविन्यपूर्ण 'ग्रामसंवाद' कार्यक्रम व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडी प्रशासनाला आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी चिमूर गडचिरोली क्षेत्राचे खासदार अशोक नेते, आ. देवराव होळी, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपसभापती विनोद देशमुख, जि.प.सदस्य राहुल संतोषवार, पं.स.सदस्य गंगाधर मडावी, ज्योती बुरांडे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, व्हीएसटीएफ जिल्हा समन्वयक विद्या पाल उपस्थित होते.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडी आयएसओ नामांकित करण्यात येथे कार्यरत मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर यांनी पुढाकार घेतला. शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतीत अत्याधुनिक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडीच्या बोलक्या भिंती, सौर ऊर्जा, अग्निशमन यंत्र, बायोमेट्रिक हजेरी, प्रथमोपचार पेटी, सुशोभित परिसर, सुचना व तक्रार पेटी, शिस्त, स्वच्छता, अद्ययावत रेकॉर्ड, गुणवत्ता धोरण, नाविन्यपूर्ण उपक्रम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, पक्की रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना सिंचन विहिरी, डिजिटल कनेक्टिव्हिटी, आरोग्य विषयक सुविधा पुरविल्या जात आहे. हरित व स्वच्छ ग्राम तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत घाटकुळ अव्वल ठरले. आता आदर्श व स्मार्ट ग्रामकडे गावाची वाटचाल सुरू आहे. सरपंच प्रीती निलेश मेदाळे, उपसरपंच गंगाधर गद्देकार, ग्रामसेवक ममता बक्षी, सदस्य अरुण मडावी, पत्रू पाल, कुसुम देशमुख, कल्पना शिंदे, सुनिता वाकुडकर रजनी हासे, प्रज्ञा देठे, वामन कुद्रपवार, अनिल हासे, उत्तम देशमुख, आकाश देठे, राम चौधरी, गणपती पाल, अशोक पाल, मुकुंदा हासे, स्वप्नील बुटले, विठ्ठल धंदरे, ज्ञानेश्वर चौधरी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहे.