शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ घरकुलाचे बांधकाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:23 IST

लाभार्थ्याने घरकूल न बांधताच घरकूल बांधुन पूर्ण झाल्याची नोंद असल्याचा प्रकार जिवती पंचायत समितीत काही दिवसांपुर्वी उघडकीस आला होता. यामुळे अनेक लाभार्थ्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत होते. या घरकूल गायब प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने लाभार्थ्यांना घरकूल बांधकाम करून देण्याला सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देघरकूल चोरी प्रकरण : बांधकाम न करताच बांधल्याची केली होती नोंद

फारूख शेख।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : लाभार्थ्याने घरकूल न बांधताच घरकूल बांधुन पूर्ण झाल्याची नोंद असल्याचा प्रकार जिवती पंचायत समितीत काही दिवसांपुर्वी उघडकीस आला होता. यामुळे अनेक लाभार्थ्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत होते. या घरकूल गायब प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने लाभार्थ्यांना घरकूल बांधकाम करून देण्याला सुरूवात केली आहे.जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापूर येथील गुंडेराव भीमू आत्राम, विठ्ठल लटारी नैताम यांना इंदिरा आवास योजने अंतर्गत एक लाख रुपये किंमतीचे घरकूल सन २०१३-१४ या वर्षांत मंजूर झाले. तत्कालीन ग्रामसेवकांनी या लाभार्थ्यांना घरकुलाचे काम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार लाभार्थ्यांनी आपले कच्चे घर पाडून घरकूल योजनेचे घर बांधण्यास सुरूवात केली व बँकेचे खातेही उघडले. त्यानंतर एका महिन्यानी जिवती पंचायत समितीमध्ये पहिला बिल घेण्यासाठी गेले असता लाभार्थ्यांना धक्काच बसला.शासन दरबारी आपले घरकूल बांधकाम पूर्ण झाले, अशी नोंद असल्याने त्यांना घरकुलाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे कच्चे घर पाडल्याने लाभार्थ्यांना परिवारासह उघड्यावरच जीवन जगावे लागत होते. याची दखल घेत ‘लोकमत’ने २४ जानेवारीला ‘लाभार्थ्यांचे घरकूल गायब’ असे वृत्त प्रकाशित केले. तेव्हा जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले.तालुका संवर्ग विकास अधिकारी सुरेश बागडे व सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रणव बक्शी यांनी त्या लाभार्थ्यांची भेट घेतली. तुम्हाला लवकरच घरकुलाची रक्कम मिळेल, असे आश्वासन दिले. त्यानुसार या लाभार्थ्यांना पैसे मिळाले असून घरकूल बांधकामाला लाभार्थ्यांनी सुरूवात केली आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.आम्हाला सन २०१३-१४ या वर्षात घरकूल मंजूर झाले. त्यानंतर ग्रामसेवकाच्या सांगण्यावरून आम्ही कुळाचे घर पाडून घरातील पाळीव शेळ्या विकून जोत्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर पंचायत समितीत घरकूलाचा पहिला बिल मिळवण्यासाठी गेलो असता, आमचे घरकूल पूर्ण झाल्याची नोंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षापासून कुटुंबासह उघड्यावर जीवन जगत होतो. अनेकदा पंचायत समितीत पत्रव्यवहार केला. पण आमचे कोणीच ऐकत नव्हते. लोकमतने आमची व्यथा मांडताच आज आमचे घराचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहेत.- गुडेराव आत्राम, विठ्ठल लटारी नैताम,लाभार्थी, जनकापूर.