शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ रस्त्याने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:12 IST

येथील शिवाजी चौक ते सावरकर चौक रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक अडचणीत, असे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका व पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटवून यापुढे अतिक्रमण केल्यास कडक कार्यवाहीचा इशारा दिला.

ठळक मुद्देअतिक्रमण हटविले : ब्रह्मपुरी पालिका व पोलिसांची कारवाई

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : येथील शिवाजी चौक ते सावरकर चौक रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक अडचणीत, असे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका व पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटवून यापुढे अतिक्रमण केल्यास कडक कार्यवाहीचा इशारा दिला. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.ब्रह्मपुरी शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता म्हणून शिवाजी चौक ते सावरकर चौकाला ओळखले जाते. या रस्त्यावर अनेक वर्षापासून अनेकांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना वाहतुकीसाठी त्रास सहन करावा लागत होता. अनेकांनी पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेट घेऊन प्रशासनाकडे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. या समस्येची दखल घेत ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे नगरपालिका व पोलीस प्रशासन जागे झाले. दोन्ही विभागाने कार्यवाही करून संपूर्ण अतिक्रमण हटविले. केवळ अतिक्रमणच हटविले नाही तर अतिक्रमणधारकांना मोठा दंडही भरावा लागेल, अशा सूचनाही केल्या. त्यामुळे सध्यातरी अतिक्रमणधारक धास्तावले आहेत. पुढे अतिक्रमण पुन्हा जैसे थे होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने सर्तक राहण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. तात्पुरते का होईना, एकदाचे अतिक्रमण हटले व हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. ही कारवाई न.प. मुख्याध्याधिकारी मंगेश खवले, अभियंता बंडावार, आरोग्य निरीक्षक रामदास ठोंबरे, नगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस निरीक्षक विलास चव्हाण व त्यांच्या कर्मचाºयांनी केली. या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत असले तरी या रस्त्यावर कधीच अतिक्रमण होवू नये, यासाठी पालिकेने दक्ष राहण्याची मागणी नागरिकांकडून केली आहे.