शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

१५ वर्षांनंतरही दुर्गापूर बायपास रिंगरोडला पूर्णत्वाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 00:36 IST

शहरावर पडणारा वाहतुकीचा भार कमी व्हावा आणि जड वाहतूक शहराबाहेरून वळविली जावी यासाठी आराखड्यात नवे बायपास मार्ग आखले असले ....

शहरावर पडतोय ताण : विकासाला बसली खीळचंद्रपूर : शहरावर पडणारा वाहतुकीचा भार कमी व्हावा आणि जड वाहतूक शहराबाहेरून वळविली जावी यासाठी आराखड्यात नवे बायपास मार्ग आखले असले तरी दुर्गापूर-तुकूम बायपास मार्गला १५ वर्षांतरही पूर्णत्वाची प्रतीक्षा आहे. २००० मध्ये हा मार्ग आराखड्यात समाविष्ठ होऊनही प्रत्यक्षात मार्ग अस्तित्वात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा उदासिन दिसत आहे, यामुळे चंद्रपूर शहरावरील वाहतुकीचा भार मात्र सतत वाढतच आहे.वरोरा नाका उड्डाण पूल अस्तित्वात येताना या बायपास मार्गाच्या निर्मीतीचा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र प्रशानसाच्या रेट्यापुढे ही चर्चा मागे पडली. त्यामुळे नकाशावर असणारा हा मार्ग प्रत्यक्षात अस्तित्वात केव्हा येणार, याचा अंदाज कुणालाही नाही. कुंदन प्लाझा ते तुकूम आणि पुढे बंगाली कँपजवळील मूल मार्गाला जावून मिळणारा हा दुर्गापूर-तुकूम बायपास मार्ग आखण्यात आला आहे. सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या या मार्गात अलिकडे अतिक्रमणाचा अडथळा वाढला आहे. कुंदन प्लाझा चौकातून निघणारा हा ६० मिटर रूंदीचा बायपासमार्ग तुकूममधून पुढे विधी महाविद्यालासमोरून निघतो. मात्र कुंदन प्लाझा ते विधी महाविद्यालयापर्यंतच्या तीन किलोमीटर मार्गावर या प्रस्तावित मार्गाच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा कुठेच दिसत नाहीत. दरम्यानच्या या मार्गावर सुमारे १० ते १५ पक्की घरेही उभी झाली आहेत. त्यांना प्रशासनाने मंजुरी कशी दिली आणि ती कोणत्या आधारावर बांधली गेली, हे सुद्धा एक कोडेच आहे.या परिसरात सुमारे १०० एकर अकृषक जमीन आहे. जमिनमालकांनी प्लॉट पाडून विकण्याचा प्रयत्न करूनही कुणी ग्राहकच फिरकत नाही. कारण, या भागाला जोडणारा अ‍ॅप्रोच मार्गच अस्तित्वात नाही. अशाही स्थितीत सुमारे २०० घरे या भागात उभी झाली आहेत. मात्र त्यांच्यासाठी रस्ता नसल्याने रेल्वे रूळ ओलांडून धोकादायक स्थितीत या नागरिकांना ये-जा करावी लागते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. शहराच्या वाढीला या परिसरात वाव असूनही केवळ मार्ग नसल्याने या परिसरातील भूखंड ओस पडले आहेत. सात ते आठ ले-आऊटधारक या परिसरात आहेत. मात्र अत्यल्प दर ठेवूनही ग्राहक प्रतिसाद देत नाहीत. रेल्वे रूळाच्या अलिकडे दीड ते दोन हजार रूपये चौरस फुट दर आणि पलिकडे मात्र दोनशे ते अडिचशे रूपये दर अशी स्थिती आहे. हा मार्ग अस्त्विात आला तर वरोरा नाका चौकातून नागपूर-बल्लारपूर मार्गावरून जाणारी जड वाहतूक या बायपास रिंग रोडने वळविणे शक्य आहे. या मार्गवरील वाहतुकाचा भार आणि चौकात घडलेले ५४ अपघात लक्षात घेवून उड्डाण पूल बांधण्यात आला, मात्र हा पूल केवळ एकपदरी असल्याने तोडगा निघाला असे म्हणता येणार नाही. शहराच्या विकासात भर घालू शकणारा हा बायपास मार्र्ग अस्तित्वात कधी येणार याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)