भद्रावती : खेळ म्हटला की जय-पराजय आलाच. तरी पण जो जिंकला तोच सिकंदर ठरतो. जय-पराजयानंतर जी खिलाडू वृत्ती दाखविल्या जाते, ती सर्वात महत्वाची असते. याच खिलाडू वृत्तीचे दर्शन दक्षिण आफ्रीकेच्या खेळाडूंनी घडविले. याची अनुभूती भद्रावतीच्या अविनाश सिध्दमशेट्टीवार व प्रा. विनोद घोडे यांना नागपूरच्या विनामतळावर घेतली. नुकताच वेस्ट इंडिज विरूद्ध दक्षिण आफ्रीका असा सामना नागपूर येथील जामठा मैदानावर पार पडला. त्यात वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रीकेचा पराभव केला. नंतरच्या मॅचसाठी रवाना होण्यासाठी दक्षिण आफ्रीकेचा संघ नागपूर विमानतळावर आला असता भद्रावती येथील रोटरी क्लबचे सचिव अविनाश सिध्दमशेट्टीवार व सदस्य प्रा. विनोद घोडे यांनी दक्षिण आफ्रीकेच्या जे.पी. डुमीनी व इम्रान ताहीर या खेळाडुंशी संवाद साधला. त्यावेळी हाशिम आमला, डिकॉक या खेळाडुंसह संघाचे प्रशिक्षकही होते. सामन्यात पराभव झाल्यानंतर त्यांचे सांत्वन केले. तेव्हा क्रिकेट खेळात जय-पराजय चालतच असतो. वेस्ट इंडिजचे खेळाडू चांगले खेळले. आम्ही कुठेतरी कमी पडलो. पुढील समान्यात चांगले प्रदर्शन करू, असे सांगून दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखविली. नंतरच्या मॅचसाठी रवाना होताना दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा व अविनाश सिध्दमशेट्टीवार व प्रा. विनोद घोडे यांचा एकाच विमानाने प्रवासही झाला. हे दोघे रायपूरला रोटरी क्लबच्या बैठकीसाठी जात होते. (तालुका प्रतिनिधी)
द.अफ्रिकेच्या खेळाडूंनी दिला खिलाडू वृत्तीचा परिचय
By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST