शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

वनविभागातील अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 12, 2015 03:39 IST

वनविभागाच्या सेवेत कार्यरत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्वावर

कुटुंबाची वाताहत : १५ वर्षांपासून नोकरीसाठी सुरू आहे संघर्षकोठारी : वनविभागाच्या सेवेत कार्यरत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्याची तरतूद राज्य शासनाकडे आहे. मात्र मागील १५ वर्षापासून अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत ताटकळत आहेत. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अनुकंपाधारकाच्या समायोजनावर निर्णय घेण्याची मागणी सुनील बोनगिरवार व अनुकंपाधारकांनी वनमंत्र्यांकडे केली आहे.अनुकंपाधारकांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवली जात होती. त्यामध्ये जिल्ह्यातील उमेदवारांचा समावेश असल्यामुळे अनुकंपाधारकांना नोकरीत संधी मिळण्यासाठी पाच ते दहा वर्षाचा कार्यकाळ लागत असल्याने शासनाने नियुक्ती करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. मात्र त्यातही अनुकंपाधारकांची फरफट आजपर्यंत सुरु आहे. शासनाने अनुकंपाधारकांना नोकरीत घेण्यासाठी पाच टक्के कोटा करुन त्यात सेवानिवृत्त अथवा मुत्यूने रिक्त होणाऱ्या पदासाठी ठेवला. त्यात सुधारणा करुन पाच टक्यावरुन आता १० टक्के कोटा निर्धारित करण्यात आला.सध्या अनुकंपाधारक अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत अतिदुर्गम भागात जीवन जगत आहेत. २००० पासून एकही अनुकंपाधारकास नोकरीवर घेण्यात आले नाही. कुटुंबाचा गाडा हाकताना त्याची मोठी कसरत होत आहे. मोलमजुरी करुन कुटुंबाची उदरनिर्वाहाची समस्या दूर करण्याचा प्रयत्न होत असताना मनात केवळ एकच आशा ‘आज नाहीतर उद्या नोकरीची संधी मिळणार व कुटुंबाची होणारी वाताहत थांबणार’ असते. मात्र १५ वर्ष लोटून गेले तरी नोकरी न मिळाल्याने मनात निराशा असून जीवन मरणाचा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.शासनाने २०१४ ला नवा अध्यादेश काढून वनरक्षक पदासाठी विज्ञानात बारावी उत्तीर्ण पात्रतेची अट घातली. ती अट अनुकंपाधारकांसाठी लावण्यात आली. मात्र वनविभागात कार्यरत कर्मचारी ग्रामीण भागात व अतिदुर्गम भागात असल्याने ते आपल्या पाल्यांना विज्ञान शाखेतून शिक्षण देवू शकले नाही. अशात अनुकंपाधारकावर वरील अट अन्यायकारक ठरत आहे. नोकरीचा मार्ग बंद करण्यात आला आहे. वनविभागात लिपीक, वनरक्षक ही क गट संवर्गातील व चौकीदार, शिपाई, माळी संवर्गातील पदे अत्यंत कमी आहेत. दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदावर १० टक्के पदे एक किंवा दोन असतात. तेव्हा १५० अनुकंपाधारकांना नोकरीवर संधी मिळविण्यासाठी २० ते २५ वर्ष लागू शकतात. तोपर्यंत त्याची वयोमर्यादा पार झाली असणार. अशावेळी नोकरीवर संधी मिळणे धूसर होणार आहे.अनुकंपाधारकांना सरळसेवेत प्राधान्य देण्यात यावे. वनरक्षक भरतीसाठी १२ वी विज्ञान शाखेची अट शिथिल करण्यात यावी व अनुकंपाधारकांना नोकरीत संधी देण्याची कार्यवाही त्वरित सुरू करावी, अशी मागणी सुनिल बोनगिरवार यांच्यासह अनुकंपाधारकांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. अनुकंपाधारकांना शासनाने नोकरीत सामावून घेण्यासाठी कार्यवाही करण्यापेक्षा त्यांना दूर करण्याकडे लक्ष केंद्रीत करीत आहे. नवनवीन अटी निर्माण करुन अन्याय करीत आहे. यामुळे अनुकंपाधारकांत तीव्र संताप पसरला असून निराशा पसरल्याने त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे सुनिल बोनगिरवार यांनी म्हटले आहे.