शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

आदिवासी पुरवणी अर्थसंकल्पात विदर्भातील चार जिल्ह्यांना खो

By admin | Updated: January 23, 2016 01:21 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या ८ डिसेंबरला घोषित झालेल्या २०१५-१६ च्या पुरवणी अर्थसंकल्पात

एकही काम नाही : मंत्री विदर्भाचे; पण काय कामाचे ?चंद्रपूर : राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या ८ डिसेंबरला घोषित झालेल्या २०१५-१६ च्या पुरवणी अर्थसंकल्पात राज्य मार्ग निधी अंतर्गत मंजूर कामाच्या यादीतून विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती हे जिल्हेच गायब झाले आहेत.विदर्भाचा सर्वांगीण विकास करू असे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारला पुरवणी अर्थसंकल्पात विदर्भाचाच विसर पडला आहे. वरील चार जिल्ह्यांना एकही काम देण्यात आले नाही. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आदिवासी विकास मंत्री विदर्भाचे असूनही काय कामाचे, असा सवाल विदर्भ राज्य आंदोलन समितीने उपस्थित केला आहे.यापूर्वी १३ जुलै २०१५ च्या आदिवासी विकास विभागाच्या पुरवणी अर्थ संकल्पात ६५ कोटी निधीची तरतूद करण्यात आली होती. परंतु त्यातून चंद्रपूर, यवतमाळ व अमरावती या तीनही जिल्ह्यांसाठी निधीची तरतूद शुन्य होती. आताही पुन्हा तोच अन्याय भाजप सरकारने विदर्भावर केला आहे. २०१५-१६ च्या पुरवणी अर्थसंकल्पात नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक म्हणजे ५४३ कामे मंजूर करून त्यासाठी ३८ कोटी ४७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे तर नुकत्याच झालेल्या पालघर जिल्ह्याला २११ कामे मंजुर झाली असून २२ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. विशेष म्हणजे, आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांचा हा जिल्हा आहे. यामुळे विदर्भावरील अन्याय स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे.नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात ८ डिसेंबर २०१५ रोजी मांडलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागाच्या राज्य मार्ग निधी अंतर्गत १३८ कोटी ४४ लाख १८ हजार एवढ्या रकमेची ८८१ कामे मंजूर झाली. या निधीतून आदिवासी उपयोजना क्षेत्रातील जिल्ह्यात रस्ते, पुल व डांबरीकरण होणार आहे. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व अमरावती या आदिवासी उपयोजना समाविष्ठ असलेले जिल्हे पूर्णत: कोरडे राहिले असून एकही काम मंजुर झाले नाही. प्रत्येक जिल्ह्यात समप्रमाणात किमान दहा कोटी ६५ लाख रुपयांच्या कामाची तरतूद वाट्याला आली असती. परंतु तसे केले नाही. विदर्भाच्या आदिवासी राखीव क्षेत्रातून व बहुसंख्येने आदिवासी असलेल्या मतदारसंघातून विधानसभा व भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून आले असताना आणि सत्तारुढ असताना हे मंत्री व आमदार कोणत्या कामाचे, असा संतप्त सवाल विदर्भ राज्य आंदोलन समितीचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबिरकुमार चक्रवर्ती, राम नेवले, अ‍ॅड. नंदा पराते, अरुण केदार आदींनी उपस्थित केला आहे. (शहर प्रतिनिधी)