नागभीड : प्रशासकीय कामात गतीमानता यावी तसेच शासकीय आदेश तत्काळ संबंधितापर्यंत पोहचविता यावेत यासाठी प्रशासकीय पातळीवर ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुपला आता मान्यता देण्यात आली आहे. नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी १८ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात तसे आदेशच काढले आहेत.व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करताना शिक्षण उपसंचालकांनी काही नियम घालून दिले असून या ग्रुपवरून केवळ प्रशासकीय आदेशाची देवाण घेवाण व्हावी, शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यात या ग्रुपची मदत व्हावी. प्रशासकीय बाबीची योग्य अंमलबजावणी व्हावी, हे नियम आहेत. शुभेच्छा, विनोद आदी संदेश या ग्रुपवर टाकू नयेत, असेही या आदेशात स्पष्ट बजावण्यात आले आहे. ग्रुप कोणत्या पातळीवर तयार करावा, ग्रुपचा अॅडमिन कोण असेल आणि ग्रपमध्ये कोणाला सामिल करून घ्यावेत याचे वस्तुपाठही या आदेशात देण्यात आले आहेत. गृप तयार करण्यात आल्यानंतर सर्व ग्रुपमध्ये शिक्षण उपसंचालकांचे सदस्यत्व अनिवार्य करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
‘व्हॉट्सअॅप’ ग्रुपला प्रशासकीय मान्यता
By admin | Updated: November 21, 2015 00:57 IST