शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीच्या शिवाजी चौकातील कॉम्पलेक्सला प्रशासनाची नोटीस

By admin | Updated: August 7, 2015 00:05 IST

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी चौकातील कॉम्प्लेक्स मालकांना अवैध बांधकाम प्रकरणी नगरपरिषद प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अशोक भैय्या यांची मागणी : अनाधिकृत बांधकामधारकांवर कारवाई व्हावीब्रह्मपुरी : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी चौकातील कॉम्प्लेक्स मालकांना अवैध बांधकाम प्रकरणी नगरपरिषद प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे कॉम्प्लेक्स पुन्हा वादाच्या भोवऱ्यात गडद होत गेले आहे. या अनाधिकृत कॉम्प्लेक्सबाबत विद्यमान उपाध्यक्ष अशोक भैय्या यांनी विशेष सभा बोलवून कार्यवाही करण्याची मागणी केली असून सदर प्रकरणाला फौजदारी वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६५ चे कलम ५३ चे तरतूदी प्रमाणे वर्णन केलेल्या जमिनीचा भूखंडावरील व्यवसायिक इमारतीचा विकास नियमाप्रमाणे केला नसून सदर इमारतीमध्ये नियमबाह्य बांधकाम असल्याचा अहवाल नगरपरिषद प्रशासनाकडे पाठविला गेला आहे. सन १२८६/१ शिट नं. १२ मौजा ब्रह्मपुरी आराजी १३४०.६३ चौ. मीटर मध्ये व्यापार संकुल बांधकामात पाच त्रुट्या आढळून आल्या होत्या. त्यामध्ये मंजुरीपेक्षा जास्तीचे बांधकाम, उक्त अधिनियमान्वये आवश्यक असलेली परवानगी न घेता, मंजूर केलेल्या परवानगीप्रमाणे बांधकाम नाही, नियमाप्रमाणे मुदत वाढ मंजुरी नाही, मंजूर करण्यात आलेली परवानगीनुसार पार्र्कींगची सोय नाही आदी त्रुटी दाखवून नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीसमध्ये व्यापारी संकुलनाचे बांधकाम त्वरीत थांबवून सदरहू नोटीस मिळाल्याच्या एक महिन्याच्या कालावधीत अनाधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबाबत पूर्तत: करण्यास कारवाईत कसूर केल्यास फौजदारी दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या साऱ्या प्रकरणावर विद्यमान उपाध्यक्ष अशोक भैय्या यांनी नगरपालिकेची विशेष सभा बोलावून विषय चर्चेस घडवून आणला व त्यावर उचीत कार्यवाही करण्याचे पालिका प्रशासनाला निर्देश दिले. त्यामुळे हे प्रकरण न्यायाच्या दिशेने गेले पाहिजे अशी नागरिकांची अपेक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)