शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू आजारावर प्रशासनाची धावपळ

By admin | Updated: August 28, 2014 23:42 IST

तालुक्यातील बेलगाव (कोलारी) येथे अनेकांना डेंग्यु आजाराची लागण झाली. आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

ब्रह्मपुरी : तालुक्यातील बेलगाव (कोलारी) येथे अनेकांना डेंग्यु आजाराची लागण झाली. आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. लोकमतने ‘बेलगावात डेंग्युची लागण’ या आशयाची बातमी प्रकाशित झाली. हे वृत्त छापून येताच जिल्हा वैद्यकीय प्रशासन व स्थानिक पोलीस प्रशासन यांनी आज गावात दिवसभर आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. वैद्यकीय प्रशासनाची चमू दिवसभर गावात सर्तक होती व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. गावात शेणाचे व तनसाचे ढग घराशेजारी असल्याने डासांचे प्रमाण वाढले होते.त्यामुळे डेंग्युचा आजार वाढला. शेणाचे ढिग हटविण्यात यावे या बाजूने गावकरी होते. तर काही नागरिक विरोधात होते. शेवटी पोलीस जमादार सुरेश पानसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावकऱ्यांना समजवून मध्यस्थती करण्याचा प्रयत्न केला. सर्वसमावेशक घडामोडीतून जेसीबी लावून खड्डे बुजविण्याचा निर्णय घेण्यात आला. डेंग्युच्या आजारासाठी गावकरीच कारणीभूत असल्याचे निर्दशनास आले. गावात फेरफटका मारला असता घरी शौचालय असून त्याचा वापर होत नसल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने ठराव घेऊन शौचालय वापर बंधनकारक करण्याविषयी ठराव घेतला. दरम्यान जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता सतिश वारजुकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जी युवती आजाराने दगावली, तिला आर्थिक मदत दिली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला तत्काळ उपाय योजना करण्याविषयी सूचना दिल्या. आजाराची परिस्थिती प्रशासनाच्या धापवळीने नियंत्रणात आहे. (तालुका प्रतिनिधी)