शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: May 31, 2017 01:43 IST

राज्यात मान्सून लवकर धडकणार असे वर्तमान आल्यानंतर जिल्हा प्रशासन वेगाने कामाला लागले

अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश : अधिकाऱ्यांची आढावा बैठक लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : राज्यात मान्सून लवकर धडकणार असे वर्तमान आल्यानंतर जिल्हा प्रशासन वेगाने कामाला लागले असून मंगळवारला जिल्हयातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत साफल्य सभागृहात पार पडली. यामध्ये पावसाळयात उद्भवणाऱ्या अघटीत घटनांचे आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी विविध उपाय सूचवण्यात आले. तसेच यंत्र सामुग्री तपासून तयार ठेवण्याचे व याकाळात मुख्यालय न सोडण्यांचे निर्देश देण्यात आले. महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यासह सर्व तहसीलदार व जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुमडे यावेळी हजर होते. जिल्हायातून वाहणाऱ्या वैनगंगा, वर्धा, इरई, पैनगंगा, उमा, गोधनी, अंधारी, झरपट, शिर आदी नदी शेजारील संभाव्य पूरग्रस्त गावांची नोंद ठेवण्यात आली आहे. चंद्रपूर पाटबंधारे विभागाने ८६ गावे पूरप्रवण म्हणून निश्चित केले आहे. या गावांमध्ये एनेवेळी गरज पडल्यास बोटींची व्यवस्था केली जाणार आहे.त्या सुस्थितीत व इंधनभरून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन कक्ष उघडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. १ जूनपासूनच त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नावडकर यांनी यावेळी दिले आहे. यावेळी, नगरपरिषद, पाटबंधारे विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी, महाऔष्णिक विद्यूत केंद्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा आरोग्य आधिकारी, दूरसंचार, वीज पूरवठा, जीवन प्राधिकरण, वनविभाग आदी प्रमुख विभागाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या. यावेळी नावडकर यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या. यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख कार्यालयात तातडीने नियंत्रण कक्ष उघडण्यात यावे. नियंत्रण कक्षाकडे अद्यावत संपर्क यंत्रणा असावी, सकाळी ८ वाजता तहसीलदारांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. १५ जुनपर्यंत तालुका स्तरावरील आपत्ती निवारण चमू गठीत करावी, शेती, घरे, गुरांचे नुकसान, पुरग्रस्त गावे, यासंदर्भात होणाऱ्या नुकसानाबद्दल प्रत्येक कर्मचाऱ्यांची भूमिका आणि त्यांची कर्तव्याबाबतचे सुस्पष्ट निर्देश देणारे कार्यालयीन आदेश देण्याचे निर्गमित करण्यात यावे. नगरपालिका मुख्याधिकारी नगरपालिका यांनी नियंत्रण कक्षाची स्वत:जबाबदारी घ्यावी, नगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतीची माहिती घेऊन लगेच त्यांना नोटीस बजावण्यात याव्यात, नाल्या तुंबल्या असतील तर लगेच साफ करण्यात याव्यात, गाव, शहर पातळीवर याबाबतीत नाल्या सफाईचे काम झाले नसेल तर तातडीने याबाबत कारवाई व्हावी, जिल्हा क्रीडा अधिकारी आकास्मिक मदत पथकाचे नियंत्रण करणार आहेत.या पथकाने आकास्मिक परिस्थितीत उद्भवणारे संकट निवारण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री तपासून घ्यावी, आवश्यक औषधाचा साठा ठेवावा, अशा सुचना करण्यात आल्या. मदत माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक आपत्ती व्यस्थापनासाठी सर्वसामान्य जनतेने संपर्कासाठी प्रशासनाचे कान व डोळे होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूर व अन्य आकस्मिक घटनेची माहिती देण्यासाठी नागरिकांनी टोल फ्री क्रमांक- १०७७ किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक -०७१७२-२५१५९७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.