शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

श्रीच्या आगमनासाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: August 28, 2014 23:40 IST

उद्या शुक्रवारी गणेश चतुर्थी, श्रीच्या स्थापनेचा दिवस. लाडक्या गणरायाच्या आगमनाने गणेशभक्त गुरूवारपासून प्रफुल्लीत झाले आहेत. जिल्हा प्रशासनानेही यासाठी तयारी केली असून पोलीस विभागही

चंद्रपूर : उद्या शुक्रवारी गणेश चतुर्थी, श्रीच्या स्थापनेचा दिवस. लाडक्या गणरायाच्या आगमनाने गणेशभक्त गुरूवारपासून प्रफुल्लीत झाले आहेत. जिल्हा प्रशासनानेही यासाठी तयारी केली असून पोलीस विभागही सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज झाला आहे. गणेशोत्सवामुळे जिल्हाभर उत्साहाचे वातावरण आहे. श्रावण महिना तसा सणासुदीचाच महिना. मात्र या महिन्यातील विशेष आकर्षण असते, गणेशोत्सवाचे. यंदाचा गणेशोत्सवही जिल्ह्यात धडाक्यात साजरा होणार आहे. गणेशोत्सवासाठी चंद्रपुरातील बाजारपेठ सजली आहे. डेकोरेशनचे साहित्य, विजेचे नानाविध दिवे यांची दुकाने सर्वत्र लागली आहे. आज गुरुवारपासून गणेशमूर्र्तींचीही दुकाने लागली असून एकापेक्षा एक सरस मनमोहक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहे. घरगुती स्थापनेसाठी अनेकांनी आजपासून आपापल्या मूर्ती आरक्षित करून ठेवल्या आहेत. तर काहींनी आजच गणरायाला आपल्या घरात नेले आहे. शुक्रवारी विधीवत श्रीची स्थापना केली जाणार आहे. त्यामुळे आजपासून गणेशभक्तांनी पूजेचे साहित्य, प्रसादांची खरेदी करणे सुरू केले आहे. त्यामुळे आज बाजारपेठ अक्षरश: फुुलली होती. गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्वरुपातही साजरा केला जातो. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनीही तयारी सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे. ठिकठिकाणी देखावे तयार करण्यात येत आहे. उद्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अतिशय उत्साहात श्रीची स्थापना करण्यात येणार आहे.सध्या चंद्रपूरच्या अनेक रस्त्यांचे बांधकाम झालेले आहे. त्यामुळे गणरायाचा प्रवास सुखकर होईल, अशी अपेक्षा आहे. तरीही महानगरपालिकेने ज्या रस्त्यांवर खड्डे असतील, ते बुजविण्याचे काम सुरू केले आहे. (शहर प्रतिनिधी)