शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नत झालेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन आठ दिवसांवर

By admin | Updated: July 17, 2014 00:00 IST

आरटीअ‍ॅक्टनुसार मुख्याध्यापकांचे समायोजन झाल्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन आज करण्यात येणार होते. मात्र पदवीधर शिक्षक आणि सेवाज्येष्ठता यातील कोणत्या

चंद्रपूर : आरटीअ‍ॅक्टनुसार मुख्याध्यापकांचे समायोजन झाल्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन आज करण्यात येणार होते. मात्र पदवीधर शिक्षक आणि सेवाज्येष्ठता यातील कोणत्या शिक्षकांना प्राधान्यक्रम द्यायचा यावर संभ्रम झाल्याने आता या शिक्षकांचे समायोजन पुढे ढकलण्यात आले आहे.यासाठी आता शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.यासंदर्भाद बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्यकार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्याची चर्चा केल्यानंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, समायोजनासाठी विविध संघटनांनी आपआपले मद देऊन अधिकाऱ्यांचा संभ्रम वाढविला आहे. त्यामुळे आज होणारे समायोजन शासनाकडून मार्गदर्शन मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.डिमोशन झाल्यानंतर या शिक्षकांना आता दुसऱ्या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून काम करावे लागणार आहे. यामुळे या शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. शाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी लोटत असताना कुटुंबियांना सोडून आपल्याला कुठे जावे लागणार याची भितीही शिक्षकांना सतावत आहे. ज्या शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. त्या शिक्षकांचे शिकविण्याकडे दुर्लक्ष झाले असून आपली बदली कुठे होणार, याच विवंचनेत ते आहे. विशेष म्हणजे, विषय शिक्षक म्हणून बीएसस्सी झालेल्या शिक्षकांनाही समायोजनासाठी बोलाविण्यात आले आहे. नियमित बिएड केलेल्या २६ शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असतानाच आता पूर्वपरवानगी शिवाय बीएस्सी केलेल्या शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी पूढे येत आहे. त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन धोक्यात येण्याची शक्यता आहे. शिक्षकाची नोकरी करीत असतानाच शासनाची परवानगी न घेता शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. सोबतच त्यांना समायोजनामध्ये पदोन्नती न देता प्रथम त्यांच्या पदव्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)