शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

मृतदेहासोबत आदिवासींचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:54 IST

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील श्रीराम आदिवासी आश्रमशाळेतील आठ वर्षीय विद्यार्थी भीमराव गावडे याचा बुधवारी अकस्मात मृत्यू झाला. याची माहिती जिल्ह्यात पसरताच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी करीत प्रशासनाविरोधात आक्रोश मांडला.

ठळक मुद्देरुग्णालयासमोर आक्रोश : आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचे मृत्यू प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील श्रीराम आदिवासी आश्रमशाळेतील आठ वर्षीय विद्यार्थी भीमराव गावडे याचा बुधवारी अकस्मात मृत्यू झाला. याची माहिती जिल्ह्यात पसरताच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी करीत प्रशासनाविरोधात आक्रोश मांडला. जोपर्यंत शाळेचे संस्थाचालक घटनास्थळी येऊन मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देत नाहीत व दोषींविरुद्ध कारवाईचे निर्देश देत नाही, तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी आक्रमक भूमिका आदिवासी बांधवांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रभर मृतदेहासोबत आदिवासी बांधवांनी रुग्णालयातच ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.गोंडपिपरीपासून सात किमी अंतरावर श्रीराम अनुदानित आश्रमशाळा असून विविध तालुक्यातील ३६० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. प्रामुख्याने अहेरी, आलापल्ली, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुलांची सर्वस्वी जबाबदारी आम्ही घेऊ, असे पालकांना पटवून देत ते विद्यार्थ्यांना आणतात. परंतु वास्तविकता मात्र वेगळीच असते. भामरागड तालुक्यातील कोटी गावातील दुसऱ्या वर्गात शिकणारा भीमराव लालसू गावडे याला केवळ एका दिवसाच्या तापाने मृत्यूला सामोरे जावे लागले. यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.बुधवारी घटनेची माहिती मिळाल्यानंतर विविध भागातून प्रशासनाविरोधात व मृत कुटुंबियांना न्याय देण्याच्या दृष्टीने आदिवासी बांधवांनी रुग्णालयात एकच गर्दी केली. गंभीर प्रकरण असतानादेखील संस्थेचे पदाधिकारी रात्र होऊनही घटनास्थळी उपस्थित झाले नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांनी आक्रमक भूमिका घेत, जोपर्यंत संस्थाचालक घटनास्थळी येत नाही व मृतकाच्या आई-वडिलांना आर्थिक मदत देत नाही, तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही, असा इशारा दिला. ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातच त्यांनी ठिय्या मांडला. रात्र जागून काढली. लोकांची वाढती गर्दी पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस प्रशासनाने रुग्णालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला.यावेळी आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बोरीकर, उपाध्यक्ष साईनाथ कोडापे, लालसू नरोटे, दया लाल कन्नाके, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके समितीचे नितेश कुळमेथे, अल्का आत्राम, अश्विन पुसनाके, दीपक पेंदोर आदींची उपस्थिती होती. या प्रकरणाचा अधिक तपास गोंडपिपरीचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.संस्थाचालकाच्या बेजबाबदार धोरणामुळे या चिमुकल्या विद्यार्थ्यांला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे मृत परिवारातील एका सदस्याला नोकरी देण्याची यावी.-अल्का आत्राम, सभापती, पंचायत समिती पोंभुर्णा३० तासानंतर आले संस्थाध्यक्षतब्बल ३० तासांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर संस्थाचालक यांनी घटनास्थळी भेट देत आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले व या प्रकरणात दोषी असणाºया कर्मचाºयावर कारवाई करू, असे सांगितले. त्यानंतर आदिवासी बांधवांनी आपल्या आंदोलन मागे घेतले व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.सामाजिक दायित्वाचा परिचयमृतकाच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी उपाशी बसलेल्या आदिवासी बांधवांना सामाजिक बांधिलकी जोपासत येथील सामाजिक कार्यकर्ते रवी भाऊ साखलवार, अशोक मानिक, वैभव रामटेके, शैलेश बैस यांनी भोजन दान देत माणुसकीचे दर्शन दिले.शासनातर्फे लाखो रुपयांचे अनुदान संस्थेला मिळत असून ते अनुदान शाळेच्या बहुतेक सुविधांवर खर्च न करता संस्थाचालक गिळंकृत करतात. अशा शाळांची चौकशी करून कायमस्वरूपी त्यांची मान्यता रद्द करावी.- लालसू नरोटी. जिल्हा परिषद सदस्य, भामरागड