शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आदिलाबाद मार्ग बनला धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:27 IST

गडचांदूर शहरातून गेलेल्या राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगडचांदुरात दररोज घडतात अपघात : चौकात गतिरोधक आवश्यक

ऑनलाईन लोकमतगडचांदूर : गडचांदूर शहरातून गेलेल्या राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. यावर करोडो रुपये खर्च केले आहे. या मार्गावरुन दिवसरात्र वाहतूक सुरु असते. मात्र या मार्गावर गतिरोधक नसल्याने येथे दररोज किरकोळ व मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे हा महामार्ग धोक्याचा बनला आहे.या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक (पेट्रोल पंप) संविधान चौक (बस स्टँड) व बाबुराव शेडमाके चौक (सावित्रीबाई फुले विद्यालय जवळ) गतीरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने चालविली जातात. विद्यालयीन तथा महाविद्यालयीन अल्पवयीन मुले भरधाव मोटार सायकल चालवित असल्याने दररोज अपघात घडत आहेत.२१ फेब्रुवारीला सावित्रीबाई फुले शाळेजवळ याच शाळेचे शिक्षक राजेश मांढरे सकाळी शाळेत येत असताना भरधाव येणाºया मोटारसायकलने त्यांना उडविले. विशेष म्हणजे मोटारसायकलस्वार अल्पवयीन विद्यार्थी असून त्यांच्याकडे परवानासुद्धा नव्हता, असे कळते. शिक्षक मांढरे यांना सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही.पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष देऊन तिनही चौकात वाहतूक शिपाई नियुक्त करावा, सार्वजनिक बांधकाम विभागाने तिनही चौकात गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष सुनील चिंतलवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले असून प्रशासनाने याची वेळीच दखल घेवून कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा मोठा अपघात घडू शकतो.