शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वरोºयात पोलिसांसाठी आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : रात्रंदिवस कर्तव्य पार पाडून शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणाºया पोलीस बांधवांच्या आरोग्याकरिता पत्रकारांनी पुढाकार घेणे, हे महत्त्वपूर्ण कार्य असून समाजातील प्रत्येक घटकाने या आदर्शवत कार्याची दखल घ्यावी, असे आवाहन माजी विधानसभा उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी केले.महाराष्ट्र मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित वरोरा पोलिसांसाठी वैद्यकीय तपासणी व ...

ठळक मुद्देएक हात मदतीचा : वरोरा मराठी पत्रकार संघाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : रात्रंदिवस कर्तव्य पार पाडून शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणाºया पोलीस बांधवांच्या आरोग्याकरिता पत्रकारांनी पुढाकार घेणे, हे महत्त्वपूर्ण कार्य असून समाजातील प्रत्येक घटकाने या आदर्शवत कार्याची दखल घ्यावी, असे आवाहन माजी विधानसभा उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी केले.महाराष्ट्र मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित वरोरा पोलिसांसाठी वैद्यकीय तपासणी व मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष महेश पानसे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.आसावरी देवतळे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, पत्रकार सुनील बोकडे, राजू कुकडे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण धनवलकर उपस्थित होते.मार्गदर्शन करताना डॉ. आसावरी देवतळे यांनी वैद्यकीय अधिकाºयांनी समाजाचा मुख्य घटक म्हणून पोलीस बांधवाच्या आरोग्यदायी भविष्याकरिता पुढाकार घेण्याचे आवाहन केले. डॉ.आसावरी देवतळे यांनी स्वत: महिला पोलीस व कर्मचाºयांची वैद्यकीय तपासणी केली.कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा लोकमतचे शहर प्रतिनिधी आशिष घुमे व गोंडपिपरीचे तालुका प्रतिनिधी वेदांत मेहरकुरे यांनी केले. या आरोग्य शिबिरात शहरातील डॉ. आशिष चवले, डॉ. नितीन पाटील, डॉ.विवेक लेला, डॉ. अक्षय विधाते, डॉ. दिलीप सावनेरे, डॉ. वैभव कष्टी, डॉ. राकेश पिंपळकर या डॉक्टरांच्या चमूने आरोग्य तपासणी केली तर उपजिल्हा रुग्णालय येथील विवेक वनकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तनिस्का खडसानेश, अधिपरिचारिका श्रुती चवले, समुपदेशक नेहा इंदोरकर यांनी पोलीस बांधवाची मधुमेह रक्त तपासणी केली. कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ पत्रकार शाम ठेंगडी, महिला समुपदेशक योगिता लांडगे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर व शिबिरात सहभागी डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.लोकमतच्या प्रतिनिधीचे कौतुकलोकमतचे वरोरा शहर प्रतिनिधी आशिष घुमे यांच्या संकल्पनेतून ‘एक हात मदतीचा’ उपक्रम सुरू करण्यात आला. या अंतर्गत सहा महिन्यापासून गरीब रुग्णांना आर्थिक मदत करणे, त्यांच्या पुढील उपचाराकरिता पाठपुरावा करण,े असे उपक्रम सुरू केले आहे. या अंतर्गत आतापर्यंत तालुक्यातील निशा प्रमोद मैती व विधी मेश्राम यांना पुढील उपचार घेता येत आहे. निशा मैती या गरीब महिलेच्या उपचाराकरिता जवळपास १२ लक्ष रुपये खर्च आहे. ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाखाली मदतीचे आवाहन केल्यानंतर नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आशिष घुमे यांचे कौतुक करून डॉ. आसावरी देवतळे व अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी दहा हजार रूपये व पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी पाच हजाराची मदत कार्यक्रमात जाहीर केली.