शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस आदिवासींवर कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:27 IST

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आदिवासींना दिलासा देणारा आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारकडून काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्याने केंद्र व राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये बोगस आदिवासी नोकऱ्या करीत आहेत.

ठळक मुद्देविकास परिषद : आयोगाच्या सदस्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आदिवासींना दिलासा देणारा आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारकडून काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्याने केंद्र व राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये बोगस आदिवासी नोकऱ्या करीत आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदने अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाच्या सदस्य माया इवनाते यांच्याकडे निवेदनातून केली आहे.केंद्र सरकारच्या संरक्षण, वेकोलि व रेल्वे आदी विविध विभागांमध्ये आदिवासींच्या राखीव जागांवर गैरआदिवासींनी खोट्या जातीचे प्रमाणपत्र सादर करून नोकºया करीत आहेत. राज्य सरकारच्या सेवेत असणाºया कर्मचाºयांची जात वैधता तपासण्याचा आदेश देण्यात आला. वेकोलिसह संरक्षण विभागातही हाच प्रकार घडला आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करावी. सोशल वेलफेअर फंडातून आदिवासींच्या सर्वांगीन विकासाकरिता भरीव आर्थिक निधी द्यावी, वेकोलिच्या भुसूरुंग स्फोटामुळे भद्रावतील परिसरातील अनेक घरांना भेगा पडल्या. त्यांना घरे पूर्ववत बांधून द्यावे. आदिवासींच्या जमिनी वेकोलीने संपादित केल्या. या जमिनीतून कोळसा खनन केले जात आहे. मात्र, प्रकल्पग्रस्तांना अजूनपर्यंत नोकरी दिली नाही. जमिनीचा योग्य मोबदलाही दिला नाही, यासह विविध मागण्यांचे निवेदन आयोगाच्या सदस्य इवनाते यांना देण्यात आले.कुचना येथील वेकोलि मुख्य महाप्रबंधकांच्या कार्यालयास अनुसूचित जमाती राष्टÑीय आयोगाच्या सदस्य इवनाते यांनी भेट दिली होती. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले.शिवाय, अन्यायग्रस्त प्रकरणांचे पुरावेही सादर केले.आदिवासी विकास परिषदेचे केशव तिराणीक यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष तथा पं.स. सदस्य चिंतागत आत्राम, तालुका संघटक एन. के. पेंदाम, श्रीरंग मडावी, दशरथ गेडाम, उत्तमराव आत्राम, सुभाष सोयाम, भास्कर एस. कुळसंगे, ग्यानदास जुमनाके, भीनु आत्राम, अशोक उईके, प्रणय चिवंडे तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता.