शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: June 13, 2016 02:26 IST

तालुक्यातील सोंद्री येथील वैनगंगा घाटावर अवैध गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याच्या गुप्त माहितीवरून शनिवारी रात्री महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली.

जेसीबी मशीन जप्त : वाळू तस्करांचे धाबे दणाणलेब्रह्मपुरी : तालुक्यातील सोंद्री येथील वैनगंगा घाटावर अवैध गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याच्या गुप्त माहितीवरून शनिवारी रात्री महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली. यावेळी उत्खननासाठी वापरण्यात येणारी जेसीबी मशिन जप्त केली.तालुक्यात सध्या सोंद्री व बोढेगाव असे दोन घाट रेतीसाठी अधिकृत आहेत. अटी व शर्थींच्या अधिन राहून रेती उत्खनन करण्याचा नियम आहे. परंतु रेतीमाफीया या अटी व शर्थींना पायदळी तुडवून अवैध गौण खनिजांचा उपसा करीत असतात. याची कुणकूण महसूल विभागाला अनेक दिवसांपासून होती. या आधारावर तलाठी, मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घाटावर धाड मारली. पीसी-२०० क्रमांकाची जेसीबी मशीन घाटावर उतरवून उत्खनन सुरू असल्याचे यावेळी आढळून आले. त्यामुळे सदर जेसीबी मशीन जप्त करण्यात आली. यावेळी घाटावर ११ ट्रक उभे होते. सदर कारवाई केल्यानंतर दंडात्मक कार्यवाहीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. घाट मालकावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी उमेश काळे, तहसिलदार अशोक शिऊरकार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार पुंडेकर यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)अवैध गौण खनिज प्रकरणात मागील वर्षभरात २४८ प्रकरणात २० लाख ८६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच एका प्रकरणात गुन्हा नोंदविलेला आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई अवश्य होईल व यापुढे कोणाचीही गय केल्या जाणार नाही.- अशोक शिऊरकार, तहसीलदार, ब्रह्मपुरी