शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहतुकीवर आता कारवाई

By admin | Updated: August 9, 2015 01:09 IST

जिल्ह्यातील रस्त्यावरून होत असलेल्या जडवाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा होत असून जडवाहतुकीवर सक्तीची कारवाई करा, ...

विभागीय आयुक्तांचे परिवहन अधिकाऱ्यांना निर्देश : जड वाहतुकीमुळे रस्ते खराब होत असल्याचा ठपकाचंद्रपूर : जिल्ह्यातील रस्त्यावरून होत असलेल्या जडवाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा होत असून जडवाहतुकीवर सक्तीची कारवाई करा, असे निर्देशच नागपूर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी शुक्रवारच्या चंद्रपूर येथील बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस विभागासह परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. शहरात काही दिवसांपूर्वी जडवाहतुकीवर नियंत्रण मिळविता यावे आणि जडवाहतूकदारांकडून अतिरिक्त महसूल गोळा करता यावा, यासाठी वजनकाटे लावण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र राजकीय दबावानंतर वजनकाटे लावण्यात आले नव्हते. परंतु विभागीय अधिकाऱ्यांनी चंद्रपुरातील रस्त्यांची स्थिती लक्षात घेता शहरातही वजनकाटे लावण्याचे निर्देश मनपा आयुक्तांना दिले आहेत. परिणामी शहरात आता वजनकाटे लावण्यात येणार आहे.शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जडवाहूक आणि रस्त्यांची दुरवस्था याचा आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी जडवाहतुकीच्या मुद्यावर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तर सिमेंट कंपन्या, वेकोलिच्या अधिकाऱ्यांनाही जडवाहतूक स्वीकारू नका आणि करूनही नका, असा सल्ला देतानाच वाहतूक नियमांचे पालन न केल्यास कटोर कारवाईला तयार रहा, असा इशारा दिला आहे.बैठकीला परिवहन आयुक्त सोनिया सेठी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आदींसह सिमेंट कंपन्यांचे अधिकारी, वेकोलि, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.रस्त्याच्या दुरवस्थेला जडवाहतूक, पाण्याचा योग्य निचरा न होणे ही कारणे कारणीभूत आहेत. त्यामुळे जडवाहतुकीवर नियंत्रण आणण्यासोबतच रस्त्यावर पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी संबंधीत विभागाने प्रयत्न करावे, असे अनुपकुमार यांनी सांगितले.चंद्रपूर आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असून या ठिकाणी येणारे पर्यटक रस्त्याची दुरवस्था पाहून काय संदेश नेतील, याचा विचार करण्याची गरज आहे. कंपन्यांनी वाहतूक करणाऱ्या वाहनाला जीपीआरएस पद्धती बसवावी, असे त्यांनी सांगीतले. जडवाहतुकीवर कारवाई करण्याची महसूल व परिवहन विभागाची संयुक्त जबाबदारी असून येत्या काळात ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. जडवाहतूक कायद्याने गुन्हा असल्याने अशा वाहनांवर सक्तीने कारवाई केल्या जाईल, यासाठी भरारी पथकांची संख्या वाढविल्या जाईल, असे परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी सांगितले.तिरवंजा-मोकासा, पद्मापूर-दुर्गापूर, राजुरा-लक्कडकोट, कोरपना-मूल, अजयपूर-चिरोली, आक्सापूर- चिंतलधाबा, पोंभूर्णा-गोंडपिपरी यासह एकूण १८ रस्ते जडवाहतुकीमुळे क्षतिग्रस्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांना दिली. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत ६६४ अतिभारीत जडवाहने तपासली असून ७२ लाख ५१ हजारांचे तडजोड शुल्क वसूल केल्याचे म्हैसेकर यांनी बैठकीत सांगितले. बैठकीला विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)