शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

बोंडच्या अतिक्रमणावर कारवाई सुरु

By admin | Updated: July 11, 2016 00:47 IST

बोंड येथील संरक्षित जंगलातील जागेवरील अतिक्रमण प्रकरणी वनविभागाची कारवाई सुरु झाली असून वनविभाग ...

मंगळवारी बयाण : अतिक्रमणधारक काय बोलतात याकडे लक्षघनश्याम नवघडे नागभीडबोंड येथील संरक्षित जंगलातील जागेवरील अतिक्रमण प्रकरणी वनविभागाची कारवाई सुरु झाली असून वनविभाग मंगळवार १२ जुलै रोजी या शेतकऱ्यांचे बयाण नोंदविणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.बोंड येथील संरक्षित जंगलात तेथीलच ३१ शेतकऱ्यांनी जवळपास १०० एकर जमिनीवर अवैध अतिक्रमण केले होते आणि ही अतिक्रमणाची प्रक्रिया जवळपास सहा महिन्यापासून सुरु होती. विश्वसनीय माहितीनुसार अतिक्रमण करण्यासाठी एकेका शेतकऱ्याने ७० ते ८० हजार रुपयापर्यंत खर्चही केला होता. तळोधी वनपरिक्षेत्र कार्यालयात नव्यानेच रुजू झालेल्या वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांच्या लक्षात ही बाब येताच हे अतिक्रमण हटविण्यात आले. महत्वाच्या मुनष्यबळासह वनविभागाला यासाठी दोन लाखांचा खर्चही आला होता. ही अतिक्रमण हटाव मोहीम संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती.या अतिक्रमणास जबाबदार कोण, याचा तपास वनविभाग करणार असून या तपासाचाच एक भाग म्हणून वनविभाग अतिक्रमणाधारक शेतकऱ्यांचे बयाण नोंदविणार आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार या शेतकऱ्यांना त्या भागाच्या क्षेत्रसहाय्यकामार्फत नोटीस देण्यात आली आहे. या चौकीत हे अतिक्रमण किती दिवसांपासून करण्यात आले. याची प्रामुख्याने तपासणी होणार असली तरी अतिक्रमणधारक आणखी काही वेगळे बयाण देतात काय, याकडेही अनेकांचे लक्ष वेधले आहे. अतिक्रमण धारकांचे हे बयाण नोंदविण्यात आल्यानंतर हा संपूर्ण अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असून या अहवालाचा निष्कर्ष काय निघतो, यावर कारवाईचे भवितव्य ठरणार असल्याचे यासंदर्भात समजते. दरम्यान, हे अतिक्रमण केवळ पाच सहा महिन्यातील नाही तर गेल्या तीन-चार वर्षापासूनचे आहे. या शेतीत अनेकांनी यापूर्वी हंगामही केला आहे, अशी माहिती गावकऱ्यांकडून लोकमतला देण्यात आली.