शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

२ हजार वीज चोरांविरूद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:05 IST

महावितरण चंद्रपूर परिमंडळात मे एप्रिल २०१७ ते ३० जून २०१८ दरम्यान वीज चोरीविरूद्ध मोहीम राबवून चंद्रपूर व गडचिरोली मंडळात १ हजार ९४७ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली. सदर वीजचोरांनी ४ कोटी ५० लाखांची वीजचोरी केली. यातील ५९८ जणांनी तारांवर आकडे टाकून तर १ हजार ३४९ जणांनी मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केली. तब्बल ४३ लाख ८८ हजार ८१७ युनिटसची वीजचोरी झाल्याचे महावितरणने कळविले आहे.

ठळक मुद्देमहावितरणची धडक मोहीम : साडेचार कोटींच्या वीज चोरल्याचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महावितरण चंद्रपूर परिमंडळात मे एप्रिल २०१७ ते ३० जून २०१८ दरम्यान वीज चोरीविरूद्ध मोहीम राबवून चंद्रपूर व गडचिरोली मंडळात १ हजार ९४७ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली. सदर वीजचोरांनी ४ कोटी ५० लाखांची वीजचोरी केली. यातील ५९८ जणांनी तारांवर आकडे टाकून तर १ हजार ३४९ जणांनी मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केली. तब्बल ४३ लाख ८८ हजार ८१७ युनिटसची वीजचोरी झाल्याचे महावितरणने कळविले आहे.महावितरणचे स्थानिक विभाग, उपविभाग व शाखा अभियंता पथकाने दोनही मंडळात मे एप्रिल २०१७ ते ३० जून २०१८ दरम्यान वीजचोरांविरूद्ध धडक मोहीम सुरू केली. वीजचोरी रोखण्यासाठी तयार केलेल्या या भरारी पथकात मोठ्या कौशल्याने चोऱ्या उघडकीस आणल्या. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, सत्यनारायण जी. गुप्ता (७५ हजार) विजय ठाकरे, गडचांदूर ( ९०३ हजार), गिरीश भास्करे गडचांदूर (६० हजार), विठ्ठल राठोड, नानाजी टोंगे (४३ हजार) टायटस डेव्हिड, बल्लारपूर (१ लाख ५७ हजार) घनश्याम बाथव (६४ हजार), मानिक माकोडे (८३ हजार) रिना गुप्ता, भद्रावती (१ लाख ७७ हजार) विजय राठोड (५६ हजार) ममता छाजेड (२ लाख २४ हजार) कादंबिनी भगत चंद्रपूर (६० हजार), संदीप काळे (२० हजार) संतोष पिंपळकर (४१ हजार, रामुभाऊ गणपत शेंडे (२ लाख ६५ हजार) आदींसह अन्य शेकडो नागरिकांची वीजचोरी पकडण्यात आली. वीज वितरण कंपनीने मीटर दुरूस्ती मोहीम राबवून हजारो ग्राहकांच्या समस्या दूर केल्या. वीज देयकात सुधारणा करून अखंडित वीज पुरवठा केला जात आहे. पण काही व्यक्ती मीटरमध्ये तांत्रिक बिघाड व अन्य प्रकारे छेडछाड करून शासनाचे नुकसान करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वीज चोरी सामान्य घटना नसून एक सामाजिक गुन्हा आहे. वीजचोरी करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीवर २००३ अंतर्गत कलम १२६ नुसार दंड आकारण्याची तरतूद आहे.महावितरणचे स्थानिक विभाग, उपविभाग व शाखा अभियंत्यांनी वीजचोरीला आळा घालण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याने यापुढे होणाºया राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान टाळले आहे.अशा आहेत शिक्षेच्या तरतुदीकलम १३५ : परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे विजेचा वापर केल्यास या कलमाअंतर्गत वीजचोरी ठरते. कलम १३६ व १३७ : वीजतारांची चोरी किंवा साहित्याची चोरी खरेदी केल्यास शिक्षेची तरतूद आहे. साहित्याची चोरी करणाºया व्यक्तिला सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो. कलम १३८ : बेकायदेशीरपणे मीटरची छेडछाड करून वीजचोरी केल्यास या कलमाअंतर्गत शिक्षा होऊ शकते. याकरिता तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. कलम १३९ नुसार वीजेचा वापर बेजबबादारपणे केल्यास बहुमुल्य विजेचा अपव्यय कलमांतर्गत १० हजार रूपयांपर्यंत दंड होऊ शकतो, अशी माहिती मुख्य अभियंता महावितरण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.