शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजनेला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:26 IST

खनिज विकास निधी अंतर्गत साडेतीन कोटी खर्चून नवीन पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम पूर्ण झाले.

ठळक मुद्देपाच लाखांचे देयक थकित : महावितरणचा वीज जोडणीला नकार

आॅनलाईन लोकमतकोठारी : खनिज विकास निधी अंतर्गत साडेतीन कोटी खर्चून नवीन पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम पूर्ण झाले. पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी वीज जोडणीची प्रतीक्षा असून वीज वितरण कंपनी पाच लाखांचे थकित वीज देयक भरल्याशिवाय वीज जोडणीस नकार देत असल्याने थेंबभर पाणी मिळण्याअगोदरच पाणीपुरवठा योजनेला ग्रहण लागले आहे.१९८४ ची पाणी पुरवठा योजना ग्रा.पं.च्या अकार्यक्षमतेने दहा वर्षापासून बंद आहे. कोठारीकरांना आठ हातपंपावर अवलंबून राहावे लागते आहे. पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असल्याने शासनाने वर्धा नदीवर एक लाख ६० हजार लिटर क्षमतेची नवीन पाणीपुरवठा योजना खनिज विकास निधी अंतर्गत साडेतीन कोटी खर्चून पूर्ण केली. त्यात वर्धा नदीचे पाणी शुद्धीकरण करुन गावकऱ्यांना पुरविण्याची योजना आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा विभागाने योजना पूर्ण करुन आक्टोंबर २०१६ मध्ये त्याची तपासणी केली. ग्रा.पं.च्या निवडणुकीपूर्वी योजनेचे उद्घाटन केले. गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. दहा वर्षांच्या संघर्षानंतर आता नळाद्वारे पाणी मिळेल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र वीज वितरण कंपनीचे पाच लाख ८० हजार मागील अनेक वर्षापासून ग्रा.पं.कडे थकित आहे. वीज जोडणी केल्याशिवाय योजना सुरु होऊ शकत नाही. महावितरण थकित देयक भरल्याशिवाय वीज जोडणीला नकार देत असल्याने नवीन पाणी पुरवठा योजनेला ग्रहण लागले आहे.सध्या उन्हाळा सुरु होण्याच्या तयारीत असून गावकरी पाण्यासाठी आक्रोश करीत आहेत. गावातील आठ हातपंपापैकी अनेक हातपंप नादुरुस्त आहेत. हातपंप दुरुस्ती करण्याची जबाबदारी पंचायत समितीची असून त्याकडे तांत्रिक अडचण दाखवून दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी गावात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.गावकऱ्यांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पूर्ण तयार असून मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी होणाऱ्या यातना थांबणार आहे. सध्या गावाची शोभा वाढविण्याºया पाण्याच्या टाकीला व जलशुद्धीकरण केंद्राकडून गावकºयांना पाणी फेब्रुवारी महिन्याअखेर न दिल्यास गावकऱ्यांच्या समक्ष ग्रामपंचायतीला कुलूप ठोकू, असा इशारा तंमुस अध्यक्ष धीरज बांबोडे व ग्रा.पं. सदस्य अमोल कातकर यांनी दिला आहे.येत्या आठ दिवसांच्या आत ग्रा.पं. कडून थकित वीज देयकाचा भरणा करणार असून प्रादेशिक पाणीपुरवठा विभागाला त्रुट्या असलेल्या कामाची यादी सादर केली आहे. त्रुट्या पूर्ण झाल्यानंतर व चाचपणीअंती योजना ग्रा.पं. ला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.- एकनाथ पिंपळशेंडे, ग्रामविकास अधिकारी ग्रा.पं. कोठारी