शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड तालुक्यातील गावात राष्ट्रीय पेयजल योजनेस ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:58 IST

गेल्या आठ-दहा वर्षांपासून नागभीड तालुक्यात पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू असले तरी फार कमी योजना पूर्ण झाल्या.

ठळक मुद्देयोजनेच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा : गावकºयांना शुद्ध पाणी मिळेना

घनश्याम नवघडे।आॅनलाईन लोकमतनागभीड : गेल्या आठ-दहा वर्षांपासून नागभीड तालुक्यात पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू असले तरी फार कमी योजना पूर्ण झाल्या. उर्वरीत योजना विविध कारणांमुळे अपूर्ण असून यात शासनाचा करोडो रूपयांचा निधी पाण्यात गेला आहे.सर्वांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. यात जलस्वराज्य, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, अशा विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी शासनाने प्रत्येक योजनेसाठी लाखो रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. असे असले तरी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या लालफितशाहीमुळे आणि स्थानिक पाणी व्यवस्थापन समित्यांच्या अज्ञानामुळे व काही ठिकाणी भ्रष्ट प्रवृत्तीमुळे या योजनांचा बट्याबोळ झाला आहे.सन २०१३-१४ यावर्षी मान्यता मिळालेल्या अनेक योजना आहेत. यात मोहाळी (मोकासा), ईरव्हा (टेकडी), चिंधीचक, खडकी (हुमा), मिंथूर, कोटगाव, पारडी (ठवरे), कोथुळणा या गावांचा समावेश आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षांत मिंडाळा, कोदेपार, उश्राळ मेंढा, सोनुली (बु.) या ठिकाणी नळ योजनांना मंजुरी देण्यात आली. पण या योजनासुद्धा अपूर्णच आहेत. सर्वच योजना विविध कारणांमुळे अपूर्ण असून या योजनांचे विहिर, उर्ध्वनलिका, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था अशी कामे रखडली आहेत. अनेक योजनांना आवश्यक निधीचा तिसरा हप्ता मिळालेला नाही.प्रत्येक योजनेला लाखोंचा निधीमोहाळी योजनेस ४९.३६ लाखांचा निधी मंजूर असून आतापर्यंत ३५.८० लाख रुपये खर्च झाले आहेत. ईरव्हा येथे १९.१० लाख रुपये मंजूर असून १०.४९ लाख खर्च, चिंधीचक येथे ४२.४२ लाख मंजूर तर २०.४३ लाख खर्च, खडकी येथे ३६.८० लाख मंजूर आणि १९.३३ लाखांचा खर्च, मिंथुर येथे ४८.४९ लाख मंजूर तर १९ लाखांचा खर्च, कोटगाव येथे ४५ लाख मंजूर तर २८.५३ लाख खर्च, पारडी (ठवरे) येथे ४८ लाख मंजूर तर ३०.०९ लाख खर्च, कोथुळणा येथे ३८.८८ लाख मंजूर तर खर्च २८.९६ लाख, मिंडाळा येथे ४९ लाख मंजूर असले तरी या योजनेवर किती खर्च करण्यात आला याचा तपशील मिळू शकला नाही. उश्राळा मेंढा येथे ४० लाख मंजूर तर २४ लाख खर्च, सोनूली(बु.) येथे ४०.३८ लाख मंजूर असून आतापर्यत २२.६५ लाख रुपये खर्च झाले आहे.