शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त ४३ शेतकऱ्यांची ७६ हेक्टर जमीन संपादन मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 00:46 IST

मे. रत्नागिरी बिल्डींग प्रॉडक्ट लि. या सिमेंट कंपनीद्वारे कोरपना येथील नांदगाव (सूर्या) कवठाळा, भोयगाव, एकोडी येथील ४९६.३४ हे.आर. जमिन २५ जानेवारी १९९५ रोजी करारनामा...

हंसराज अहीर यांचा पाठपुरावा : नांदगाव, भोयगाव, कवठाळा, एकोडीच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदचंद्रपूर : मे. रत्नागिरी बिल्डींग प्रॉडक्ट लि. या सिमेंट कंपनीद्वारे कोरपना येथील नांदगाव (सूर्या) कवठाळा, भोयगाव, एकोडी येथील ४९६.३४ हे.आर. जमिन २५ जानेवारी १९९५ रोजी करारनामा करून महाराष्ट्र टेनंन्सी अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर लॅन्ड लॉ अ‍ॅक्ट १९९४ प्रमाणे सिमेंट कंपनी स्थापन करण्यासाठी घेण्यात आली. मात्र या जमिनीचा कंपनीकडून वापर न झाल्याने जवळपास ४३ शेतकऱ्यांची ७६ एकर जमीन परत करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंद पसरला आहे.शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या जमिनीचा जर ५ वर्षात खरेदी तारखेपासून उपयोग कंपनीद्वारे करण्यात आला नाही तर शेतकऱ्याला ती जमिन व खरेदी केलेल्या दराची रक्कम परत करून जमीन शेतकऱ्यांची होईल, असे करारनाम्यात स्पष्ट नमुद होते. मागील २१ वर्षांपासून या जमिनीचा कंपनीने कुठलाही वापर केला नाही व १९९५ पासून शेतकरी आजतागायत शेती करीत आहे. असे असताना कंपनीने मध्यंतरीच्या काळात ६ शेतकऱ्यांना खरेदी किंमत घेऊन जमीन परत केली. परंतु उर्वरीत जमिन ही कंपनीच्या नावे असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ शेतीचा विकास करण्याच्या दृष्टीने व खरेदी विक्री करण्यास झाला नाही. केंद्रीय राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी या प्रश्नावर मागील बऱ्याच वर्षांपासून पाठपुरावा केला व आघाडी सरकारच्या कारकीर्दीत हा प्रश्न सातत्याने लावून धरला. परंतु मागील सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. मात्र ना. हंसराज अहीर यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी २०१४-१५ मध्ये पत्रव्यवहार करून व १६ जून २०१५ रोजी उद्योगमंत्र्यांसोबत बैठक लावून या समस्येचा निकाल लावला. जमिन संपादनमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जमिनी परत करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करावी, असा आदेश २३ जुलै रोजी शासनाने निर्गमीत केला आहे. मंत्रालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव उपविभागीय अधिकारी राजुरा व अंतिमरित्या तहसिलदार कोरपना यांनी १३ जुलै रोजी जमिनीची विक्री करून शेतकऱ्यांना परत केली. ही जमिन शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यात केंद्रीय मंत्र्यांना यश आल्याने शेतकऱ्यांत आनंद पसरला आहे. शेतकऱ्यांनी जमिनीचे सातबारा तातडीने तहसिल कार्यालयातून आपल्या नावे करावे, असे आवाहन भाजप तर्फे करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)