शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या एव्हरेस्टवीरांची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 14:11 IST

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडसाच्या जोरावर एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची कामगिरी देशातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराष्ट्रपती कोविंद यांच्याकडून कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडसाच्या जोरावर एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची कामगिरी देशातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.या विद्यार्थ्यांनी आज रायसिना हिल्स स्थित देशाची शान असणाऱ्या राष्ट्रपती भवनात प्रवेश केला. मनीषा धुर्वे, कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम आणि प्रमेश आडे या एव्हरेस्टवीर विद्यार्थ्यांचा प्रचंड आत्मविश्वास पाहून राष्ट्रपतींनीही त्यांच्याशी मनमोकळया गप्पा मारल्या. एव्हरेस्ट सफरीतील त्यांचे विविध किस्से जाणून घेताना राष्ट्रपतींची मुद्रा कधी गंभीर तर कधी भावुक होत असल्याचे राष्ट्रपती भवनाने अनुभवले.चंद्रपूरच्या या विद्यार्थ्यांनी उणे ४५ अंश सेल्सिअस वातावरणात एव्हरेस्ट शिखर सर केले, ही कौतुकास्पद व अभिमानाची बाब असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा व आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील या वारीसाठी निवड झालेले मात्र काही कारणास्तव एव्हरेस्ट सर करताना माघार घ्यावी लागलेले इंदू कन्नाके, अक्षय आत्राम, शुभम पेंदोर, छाया आत्राम आणि आकाश मडावी हे या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाले .शुक्रवारी पंतप्रधानांना भेटणार एव्हरेस्टवीरहे विद्यार्थी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेणार आहेत. यापूर्वीच पंतप्रधानांनी देशवासीयांसोबत संवाद साधताना या विद्यार्थ्यांच्या एव्हरेस्ट चढाईचे ‘मन की बात’ कार्यक्रमातून कौतुक केले आहे. त्यामुळे हे विद्यार्थी त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद