शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी

By admin | Updated: June 13, 2016 02:29 IST

पैशाच्या वादातून मित्राची हत्या करणाऱ्या अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

ब्रह्मपुरी : पैशाच्या वादातून मित्राची हत्या करणाऱ्या अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.ब्रह्मपुरी येथील वनविभागाच्या पटांगणावर शुक्रवारच्या रात्री अजय श्यामराव रामटेके (२३) रा.ब्रह्मपुरी याची त्याच्याच एका अल्पवयीन मित्राने पैशाच्या वादातून हत्या केली होती. शनिवारी सकाळी या घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच, शहरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मृताची ओळख पटल्यानंतर अजय रामटेके याच्या मारेकऱ्याचा शोध सुरू करण्यात आला. ब्रह्मपुरीचे पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाला वेग देऊन मृत अजयच्या ३ ते ४ मित्रांना अवघ्या तीन तासात ताब्यात घेतले. त्यांची कसून विचारपूस केल्यानंतर या चौघांपैकी अल्पवयीन असलेल्या अजयच्या मित्राने आपण एकट्यानेच अजयची हत्या केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला रितसर अटक केली. मारेकरी १७ वर्षांचा असल्याने त्याला न्यायालयाच्या आदेशावरून चंद्रपूरच्या बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. या हत्या प्रकरणात एकापेक्षा अधिक आरोपी असल्याची शंका पोलिसांना होती. पोलिसांनी त्या दिशेने तपासही केला. परंतु अखेरपर्यंत अल्पवयीन आरोपीने आपण स्वत:च अजयचा खून केल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात त्याला एकट्यालाच आरोपी करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)