शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

अद्याप आरोपी फरारच

By admin | Updated: November 16, 2016 01:43 IST

नागपूर-चंद्रपूर मार्गावरील दुचाकी वाहनाने जाणाऱ्या दाम्पत्यास भरदिवसा लुटण्याचा प्रयत्न झाला.

गुन्हा दाखल : दाम्पत्याला लुटण्याचा प्रयत्नवरोरा : नागपूर-चंद्रपूर मार्गावरील दुचाकी वाहनाने जाणाऱ्या दाम्पत्यास भरदिवसा लुटण्याचा प्रयत्न झाला. यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी वरोरा पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून २४ तासांचा कालावधी लोटूनही आरोपी गवसले नाही.सोमवार १४ नोव्हेंबर रोजी एमएचटी १०६९ या दुचाकी क्रमांकाने डॉ. चेतन बोबडे पत्नीसह नागपूर येथून भद्रावतीकडे जात होते. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगली गावाच्या शेतशिवारात मागवून येणाऱ्या दुचाकीस्वारांनी या दाम्पत्यास लुटण्याचा जोरदार प्रयत्न केला. दाम्पत्यांनी आरडओरडा करताच लुटणारे दुचाकीस्वार नागरिक येत असल्याची चाहूल लागताच पळून गेले. दुचाकी वाहनधारकांनी हेलमेट घातले होते. त्यामुळे त्यांना ओळखता आले नाही. याबाबत वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३९३ भादवि गुन्हा नोंदविला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी भेट देवून तपासणी दिशा तपास अधिकाऱ्यांना दिली. वरोरा पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून दुचाकीधारकांचा शोध घेण्याचा प्रयत्न १४ नोव्हेंबर रोजी केला. परंतु अज्ञात आरोपीची व त्यांच्या दुचाकी वाहनाचा थांगपत्ता पत्ता लागला नाही. वरोरा पोलिसांचे पथक मागील २४ तासांपासून या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहे परंतु अद्यापही सुगावा लागलेला नाही. नागपूर चंद्रपूर मार्ग वर्दळीचा असून या मार्गावर भर दिवसा दाम्पत्याला लुटण्याचा प्रयत्न झाल्याने दुचाकी धारकामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणात चोरट्यांनी देशी कट्टा दाखविल्याची चर्चा केली जात आहे. काही वर्षापूर्वी देशी कट्ट्याचा धाक दाखवून मांगली गावाच्या शिवारात तेल व्यापाऱ्याला लुटले होते. त्यातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते. (तालुका प्रतिनिधी)