शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अटकेतील आरोपी माजी नगरसेवकाचा मुलगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:38 IST

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनोना परिसरात दीपक लक्ष्मण टवलारकर यांना मारहाण करून त्याची चोरून नेलेली कार आरोपी उत्कर्ष नागोसे व त्याच्या मित्राने तोडफोड करून पेटवून दिली.

ठळक मुद्देराजकीय दबाब असल्याची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनोना परिसरात दीपक लक्ष्मण टवलारकर यांना मारहाण करून त्याची चोरून नेलेली कार आरोपी उत्कर्ष नागोसे व त्याच्या मित्राने तोडफोड करून पेटवून दिली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. दुसरा आरोपी अद्यापही फरारच असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. सदर प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला आरोपी नागोसे हा माजी नगरसेवकाचा मुलगा असल्यामुळे सुरुवातीपासूनच पोलिसांवर राजकीय दबाब असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. यामुळे दुसरा आरोपी अटक होण्याची शक्यताही धूसर असल्याचेही बोलले जात आहे.पेटविल्यानंतर कोळसा झालेली कार अद्यापही घटनास्थळीच उभी आहे. उलट तपास अधिकारी कार पोलीस ठाण्यात आणण्यासाठी दोन स्टेपन्या घेऊन येण्याची सूचना करीत असल्याचा आरोप फिर्यादी दीपक लक्ष्मण टवलारकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.दीपक टवलारकर यांची मारुती ८०० कार घरासमोरून बेपत्ता झाल्याची बाब मंगळवारी सकाळी उघडकीस आली. यानंतर घटनेची तक्रार करण्यासाठी पोलिसात धाव घेतली मात्र तक्रार नोंदवून घेण्याऐवजी कार शोधण्याचा सल्ला दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.यानंतर दीपक टवलारकर यांनीच कारचा शोध घेतला असता कारमध्ये उत्कर्ष नागोसे व त्याचा मित्र कारमध्ये बसून होता. त्यांना टोकले असता त्यांनी हुज्जत घालून लाकडाच्या बल्लीने प्राणघातक हल्ला चढविला. मारून टोकतील या भीतीने दीपक यांनी तेथून पळ काढताच त्या दोघांनी कारची तोडफोड करून पेटवून दिली. पोलिसांनी आधीच तक्रार नोंदवून तपास केला असता तर ही घटना टळली असती, असा आरोपही फिर्यादीने केला आहे. मात्र राजकीय हालचालीनंतर या प्रकरणात समझोता घडवून आणण्यासाठी दबाब वाढत असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. या घटनेचा तपास शहर पोलीस करीत आहेत.दोघांनी टवलारकर यांची कार चोरून नेली. कारमालकाला गंभीर मारहाण करून कार पेटवून दिली. या प्रकरणात फिर्यादीने दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुसरा आरोपी फरार आहे. कार जळून राख झाल्यामुळे कागदोपत्री जप्त केल्याचे दाखविले आहे. याप्रकरणात पोलीस निष्पक्षपणे चौकशी करीत आहे. कुठलाही राजकीय दबाब नाही. त्यांना न्याय दिला जाईल.- एस. एस. भगत, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर.