शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

वृद्ध व अपंगांना बनविले आरोपी

By admin | Updated: December 10, 2014 22:54 IST

शहरातील विंजासन परिसरामध्ये असलेल्या तलावाच्या मालकीवरुन दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी चक्क दोन वयोवृद्ध व अपंगाना आरोपी बनविले. त्यांना बेदम मारहाणही केली.

भद्रावती : शहरातील विंजासन परिसरामध्ये असलेल्या तलावाच्या मालकीवरुन दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी चक्क दोन वयोवृद्ध व अपंगाना आरोपी बनविले. त्यांना बेदम मारहाणही केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. ६ डिसेंबरला विंजासन येथील ५२ एकर तलावाच्या मालकीवरुन दोन गटात जबरदस्त हाणामारी झाली. यात एका महिलेसह दहा जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत ३४ जणांना ताब्यात घेतले. यापैकी महिला व वृद्ध आरोपींना न्यायालयाने जामीन दिला तर १३ आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. पोलिसांनी अटक सत्र राबविताना बळाचा वापर करुन अनेकांना जखमी केले. ८ डिसेंबरच्या पहाटे ७५ वर्षीय तानबा कृष्णा मांढरे व ६५ वर्षीय वृद्ध व अपंग महिला मंदा वाघू मांढरे यांना पोलिसांनी घरातून ओढून काठीने बेदम मारहाण करुन रक्तबंबाळ केले. यावेळी पोलिसांनी अश्लिल शिव्यांचा वापर केला. जखमी झालेले ४० ते ६० वर्षाच्या दरम्यानचे आहेत. त्यांना ७५ वर्षाचा वृद्ध आणि ६५ वर्षाची अपंग व वृद्ध महिला खरच मारहाण करुन जखमी करु शकते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर दोन्ही वृद्धांनी ही आपबीती लोकमतजवळ सांगितली. हे दोन्ही वृद्ध पोलिसांच्या मारहाणीमुळे जखमी होते. तसेच अंगावरील कपडे रक्तांनी माखले होते. यातील एकाला काठीचा आधार घेतल्याशिवाय चालता येत नाही. पोलिसांनी अशा वृद्धांना मारहाणीतील आरोपी बनवून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार केला असून याबाबत रोष व्यक्त केला जात आहे. विंजासन या भागातील नागरिक पोलिसांच्या या दडपशाहीमुळे घरदार सोडून बाहेर गेले आहेत. (शहर प्रतिनिधी)